प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
आज दिनांक १५ सप्टेबर, २०२३ या दिवशी श्री. आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व नगरपालिकेचा स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये श्री आ. गं. हायस्कूल सावदा चे कलाध्यापक नंदकिशोर पाटील (नंदू सर) यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ही शाडूच्या माती पासून कशी बनवावी व पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे आताच्या काळामध्ये किती महत्त्व आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंग यापासून पर्यावरणाची होणारी हानी किती घातक आहे हे विशद केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष गणपती बाप्पा कसा तयार करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या प्रात्यक्षिकानंतर श्री आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा चे विद्यार्थी व विद्यार्थिनी, नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन गणपतीच्या मूर्तीचे प्रशिक्षण घेऊन स्वतः गणेश मूर्ती तयार करून अतिशय सुंदररीत्या आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
याप्रसंगी रावेर तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी या कार्यशाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती किती आवश्यक आहे व आपण हा उपक्रम अतिशय उत्साहाने राबवत आहात म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे कलाध्यापक नंदू पाटील यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, आणि पदाधिकारी सचिन चोळके, अरूणा चौधरी, संजय महाजन सर, सौ. भारती महाजन मॅडम, सौ. प्रणाली काटे मॅडम, सौ. निर्मला बेंडाळे मॅडम, वाय. एन. पाटील, दिलीप काळे उपस्थित होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



















Post a Comment