मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने निंभोरा कृषी विद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन..
प्रतिनिधी | निंभोरा
येथील कृषी विदयालयात मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विदयालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्रा. संजय मोरे हे होते. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक त्रिशरण पंचशील बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी प्रा. मोरे यांनी "डॉ. आंबेडकर जागतिक विद्या भुषित महामानव असुन आजच्या युवा पिढीने डॉ. आंबेडकर यांच्या विचाराच्या दिशेने वाटचालं करून आपल्या आयुष्याचे तथा समाजात नावलौकिक त्याचप्रमाणे मानवता धर्माचे आचरण करावे." असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे अध्यक्षीय मनोगतात प्रल्हाद बोडे यांनी, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांला एक मताचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातुन मिळवुन दिला."असे सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे, टी व्ही ९ चे विलास सावकारे होते. प्राचार्य मोहन भंगाळे, उपप्राचार्य विवेक बोडे, प्रा. संदीप महाजन, डॉ. धनराज बावस्कर, मानव अधिकार जिल्हा उपाध्यक्ष डॉ. धनराज बावस्कर, जितेंद्र भावसार, जितेंद्र कोळंबे, बापु कोळी, रोहित तायडे, अक्षय भालेराव, प्रथमेश पाटील, दिपक कोळी, विनीत प्रजापती, चिन्मय फेगडे, रोहित चौधरी, लोकेश पाटील, चंदन पाटील, जयेश कोंडे सह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन विवेक बोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप महाजन यांनी केले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment