Khandesh Darpan 24x7

अवैध गौण खनिज तस्करी चा हा घ्या पुरावा, महसूल प्रशासन कारवाई करणार का?

 

 

प्रतिनिधी | निंभोरा




रावेर तालुक्यातील चिनावल, वडगांव, निंभोरा, दसनूर, सिंगनूर, सिंगत, बलवाडी तर सातपुडा पर्वताच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण पाल या सुकी नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू, खरवा, माती, गाळ, आदी गौण खनिजांची उत्खनन करून रात्री तसेच भरदिवसा उत्खनन करून वाहतूक केली जाते आहे.


महसूल प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान नित्यनेमाने सुरुच आहे.  खुलेपणाने राजरोस वाळू माफिया गौण खनिज तस्कर रात्रंदिवस गौण खनिजांची उत्खनन करून भरदिवसा विनापरवाना वाहनांद्वारे वाहतूक करतांना दिसत आहे मात्र एखादं थातूरमातूर कारवाई वगळता महसूल चे अधिकारी कर्मचारी या अवैध गौण खनिज तस्करी कडे दुर्लक्ष करतांना सध्यातरी दिसत असल्याचे समजते? 



वाळू माफिया गौण खनिज तस्कर महसूल प्रशासनाची कोणतीही कसलीही तमा न बाळगता, धाक न करता खुलेपणाने, निर्धास्तपणे सुकी नदी पात्रातील पाल घाटरस्ता मार्गाने -खिरोदा, चिनावल, वडगांव, निंभोरा दसनूर, सिंगनूर, सिंगत, बलवाडी या सुकी नदी पात्रातील अवैध गौण खनिज वाळू, खरवा, माती, गाळ काढून बिनदिक्कत बिनबोभाट उत्खनन तस्करी करुन वाहतूक करीत आहेत. 


या सुकी नदी पात्रातील अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहनांची नदी पात्रात झालेली वर्दळ बरेच काही सांगून जाते तरी सुकी नदी पात्रातील मोठा वाघोदा येथील शेतकरी बांधव यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहनांत भरतांनाचे चलचित्र (व्हिडिओ) व छायाचित्र मोबाईल मध्ये छायांकन (शूट) करीत महसूल प्रशासनाला "साहेब हा घ्या पुरावा आतातरी कारवाई केली जाईल का?" असा प्रश्नांकित सवाल केला आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

Previous Post Next Post