प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील दसनूर येथील माऊलीचे भक्त पांडुरंग लक्ष्मण चौधरी हे ४ जानेवारी शनिवार रोजी आपल्या परिसरातील निंभोरा, खिर्डी, बलवाडी, तांदलवाडी येथील १५० ते २०० भाविकांना श्री गजानन महाराज संजीवनी मंदिर सिगनूर, दसनूर येथून सकाळी ५:३० वाजता भाविकांना पायी वारीने शेगाव येथे गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शनासाठी घेऊन गेले. त्यांची दिंडी ७ जानेवारीला शेगाव येथे पोहोचली व सर्व भाविकांना गजानन माऊली चे पायी दर्शन घडले जणू काही पंढरीचा पांडुरंगाच्या रूपात हा पांडुरंग आपल्या भाविकांसोबत शेगावीचा राणा गजाननाला भेटला.
पांडुरंग लक्ष्मण चौधरी हे गेल्या तीन वर्षापासून परिसरातील गजानन भक्तांना घेऊन आपले सहकारी उद्धव झांबरे भुसावळ, वासुदेव राणे जळगाव यांचे बरोबर दिंडी घेऊन जात असतात. यांची ही दिंडी श्री गजानन ग्रुप भुसावळ यांच्या दिंडीला वरणगाव महामार्गावर भेटून मार्गस्थ होते. पुढे ही दिंडी मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा, खामगाव मार्गे शेगाव पोहोचते रस्त्याने दिंडीतील भक्तगण मोठ्या आनंदाने गजानन माऊली चे भजन गातात सर्व भाविकांची चहा, नाश्ता, फराळ जेवणाची सोय करण्यात येते. अशा प्रकारे या दिंडी सोहळ्याचा शेगावी समारोप झाला. या दिंडीचे व्यवस्थापनाचे कार्य रामकृष्ण माळी व प्रभाकर नारखेडे यांनी चोख बजावले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment