Khandesh Darpan 24x7

फैजपूर येथे विद्यापीठ स्तरीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन


प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


दि. 17 रोजी विद्यार्थी विकास विभाग, कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17, 18, 19, जानेवारी 2025 रोजी तीन दिवशीय "व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आले आहे. या कर्यशाळेचे उद्घाटन प्रांताधिकारी श्री.बबनराव काकडे, यांच्या हस्ते करण्यात आले. 




प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एम. टी.फिरके (सहसचिव) तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर व संस्थेचे पदाधिकारी, प्रा.एन.ए.भंगाळे, प्रा.एस.एस.पाटील, श्री.संजय चौधरी, प्राचार्य.डॉ.आर.बी.वाघुळदे, तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, डॉ.एस.टी.भुकन, अधिष्ठाता कबचौउमवि, जळगाव उपस्थित होते. 




कार्यशाळेत धुळे,नंदुरबार,जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून पुढील तीन दिवस दि.17 ते 19 जानेवारी 2025 सर्व विद्यार्थी मुक्कामी राहून प्रशिक्षण घेणार आहेत. दरम्यान कार्यशाळेत दिवसभर सकाळी साहा ते रात्री 9:30 पर्यंत  योग,प्राणायाम, विविध विषयांवर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, खेळ, गटचर्चा, मनोरंजनात्मक कार्यक्रम व परिसर अभ्यास या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक,शारीरिक व नेतृत्व विकासाचे  प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी दिनांक. 17 रोजी फैजपूर विभागीय कार्यालयाचे प्रांताधिकारी श्री.बबनराव काकडे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर, डॉ.गणपतराव ढेंबरे 'यांनी दृष्टी नेतृत्वाची विकास राष्ट्राचा', डॉ.हरीश नेमाडे यांनी 'नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकासासाठी डिजिटल साधनांचा उपयोग, डॉ.संजीवकुमार सावळे यांनी 'आपले आपण आणि समाजमन' या विषयावर मार्गदर्शन केले, शनिवार दिनांक रोजी 18 डॉ. संजय पाटील यांचे 'पुस्तकांच्या सानिध्यातून व्यक्तिमत्व फुलताना, प्रा.उत्पल चौधरी व डॉ.एस.एस. पाटील यांचे 'मी पाहिले नेतृत्व घडताना', डॉ.मुकेश चौधरी यांचे 'व्यक्तिमत्व आणि नेतृत्व यांची सांगड, कॉलेज जीवनातून नेतृत्व विकास कसा साधावा यावर डॉ. ताराचंद सवसाकडे कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांची गट चर्चे, प्रा.एस.पी.मगर, प्रा. पल्लवी तायडे, यांचे  खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास,  तसेच रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी, डॉ. रफिक जमील शेख यांचे 'राष्ट्र उभारणीसाठी युवा नेतृत्वाची गरज', श्री.विशाल पाटील (पीएसआय, सावदा पोलीस स्टेशन) यांचे टीम वर्क आणि नेतृत्वापुढील आव्हाने अश्या विविध विषयांवर इतर तज्ञ व अनुभवी वक्त्यांचे  मार्गदर्शन लाभणार आहे. 




तसेच शेवटच्या दिवशी दुपारून 3 ते 4 वाजता डॉ.पद्माकर पाटील, अधिसभा सदस्य, कबचौउमवि, जळगाव  यांच्या अध्यक्षतेत कार्यशाळेचा समारोप प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे. या कार्यशाळेचे समन्वयक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे असून यशस्वितेसाठी त्यांचे सहकारी प्रा.अचल भोगे, डॉ.जयश्री पाटील, डॉ. ताराचंद सवसाकडे, डॉ. राजेंद्र राजपूत,प्रा. शिवाजी मगर, डॉ.सरला तडवी, डॉ.विकास वाघुळदे, डॉ. आरती भिडे, प्रा.राकेश तळेले, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. निकिता नारखेडे, शेखर महाजन, राम कोळी, भूषण चौधरी, धनु माळी परिश्रम घेत आहेत.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 







Post a Comment

Previous Post Next Post