Khandesh Darpan 24x7

डी. एस. देशमुख विद्यालयात गुणवंतांचा सन्मान

देशमुख विद्यालयात  106 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .


प्रतिनिधी | थोरगव्हाण 



थोरगव्हाण ता. रावेर येथील डी. एस. देशमुख माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ खरगोन (म.प्र.) येथील सेवानिवृत्त एचडीओ तथा सामाजिक कार्यकर्ता सुरेश बाळकृष्ण महाजन (नाले) यांचे अध्यक्षतेखाली  संपन्न झाला.  




कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, संचालक कमलाकर चौधरी, मधुकर कोल्हे, नंदकुमार चौधरी, चंद्रकात पाटील, रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली .



कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश महाजन यांचे हस्ते सरस्वती तथा सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले.



प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दी. एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना (1917) यांचे तर्फे  15 कर्तुत्ववान माहिलांचा स्मृतीचिन्ह, शॉल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.  यात ..




संचालिका- रजनीताई पाटील, 


थोरगव्हाणच्या सरपंच- रेखा तायडे, 

 

थोरगव्हाण ग्रामपंचायत सदस्या- उज्वला बाऊस्कर


सेवानिवृत्त मुख्याध्यापीका- सिंधुबाई पाटील, 


जि. प. शाळा थोरगव्हाण विद्यमान मुखाध्यापिका-चित्रा तायडे


वैशाली चौधरी, थोरगव्हाण (ह.मु. मुंबई), 


लहान वाघोदा ग्रामपंचायत सदस्या- रूपाली राजू कोलते,  


उपसरपंच चुनवाडे- सिंधुबाई गंगाधर सपकाळे,  


अंगणवाडी सेविका- सविता सदाशिव झांबरे, गाते, 


सरपंच गाते- सारिका पाटील


समाजसेविका- पुनम इश्वर कोळी, मांगी, 


सरपंच गहूखेडा- संगिताबाई तायडे, 


उपसरपंच गहूखेडा- वत्सलाबाई  चौधरी, 


पंचायत समिती सदस्या- रूपाली कोळी, रणगांव, 


आशा वर्कर- विदया सपकाळे, सुदगांव 



वरील सर्व मान्यवर महिलांचा सत्कार व सन्मान विद्यालयातील शिक्षिका जयश्री चौधरी तथा नयना पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. 




कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश महाजन व पारितोषिक वितरक जलसंपदा विभाग नाशिक चे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता- जगदिश महाजन, जि. प. नाशिक चे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता- हेमंत चोधरी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक सहकारी संस्था यावल तालुका चे ऑडीटर- पी. डी. पाटील, टेक्निकल ऑपरेशन इंडिया गव्हर्नमेंट मिंन्ट मुंबई चे मॅनेजरनितिन चौधरी, वेल्हाळा ता. भुसावळ चे उपसरपंच- हेमंत पाटील यांनी एच. एस. सी. व एस. एस. सी. या वर्गात प्रथम आलेले विद्यार्थी तसेच प्रत्येक विषयानुसार प्रथम आलेले सह शालेय उपक्रमातील विद्यार्थी यांना ठेवलेल्या ठेवीवरील व्याज तसेच रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. 


1 / 8
2 / 8
3 / 8
4 / 8
5 / 8
6 / 8
7 / 8
8 / 8




सर्व देणगीदार यादीचे वाचन मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव यांनी केले व दात्यांचे आभार मानले. समिती कडून एच. एस. सी. पात्र दाते व विद्यार्थ्यांची नावे पी. सी. कचरे यांनी तर एस. एस. सी. यादीतील नावे एम. के. पाटील तथा सहशालेय यादीतील नावे एन. बी. चौधरी यांनी वाचन केले.



सावित्रीबाई दत्तक घेतलेल्या एकूण ०४ विद्यार्थीनीना शालेय गणवेश देण्यात आले. गेल्या पंधरा वर्षा पासून विद्यालयात होतकरू व शिक्षणाची जिज्ञासा असणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या गरजू अश्या 11 विद्यार्थीनींना भुसावळ येथिल जेष्ठ नागरीक संघाचे विजय मांडळकर, मिलिंद मांडळकर यांनी याच्या मातोश्री स्व. नलिनी मांडळकर यांचे स्मरणार्थ शालेय गणवेश वाटप केले. 



संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्याची माहिती, तसेच 15 महिलांचा शॉल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देवून सत्कार करून संस्थेने सामाजिक बांधलिकी म्हणून चांगला संदेश समाज मनात दिला आहे. असे विचार मांडले. तसेच पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून यशवंत कीर्तीवंत व्हा तथा समाजात आपले व शाळेचे नाव उज्वल करा असा मौलिक सल्ला दिला. त्याचप्रमाणे आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर दात्यांचे आभार व्यक्त केले.



के. पी. चौधरी व के. एम. पाटील यांनी दर्शनी भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रोजेक्टरवर पारितोषिक दात्यांचे नाव, ठेव रक्कम, पात्र विद्यार्थी व ठेवीवरील मिळालेली रक्कम असे चलचित्र प्रेक्षकांना दाखण्याची सोय करून सहकार्य केले.



प्रसंगी संस्थेचे असंख्य भागधारक, पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष राणे सह सचिव विजय चौधरी, बाळु पाटील  तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सांस्कृतीक समिती प्रमुख पी. सी. कचरे, उपप्रमुख जयश्री चौधरी, समिती सदस्य एम. के. पाटील, एन. बी. चौधरी, नयना पाटील, के. एम. पाटील, एस. पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 



समिती सह जेष्ठ शिक्षक टी. पी. घुले यांचेसह सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक पी. सी. कचरे तथा आभार जयश्री चौधरी यांनी केले .



कार्यक्रम संपन्न झाल्यावर भोजन समितीने सर्व उपस्थितांसाठी शेव भाजी, पोळी अश्या सुरुची भोजनाची उत्कृष्ट सोय केली. 



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

Previous Post Next Post