Khandesh Darpan 24x7

पोलीस निरीक्षकांकडून पत्रकारांचा सन्मान




प्रतिनिधी | निंभोरा


पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जानेवारी हा दिवस राज्यात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रकार दिनाचे औचित्य साधत आज निंभोरा पो. स्टे. च्या वतीने परिसरातील पत्रकार यांचा सत्कार, सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पत्रकार हा सर्वांचा मित्र असून तो कधीच कोणाचा शत्रु नसतो. पत्रकार , लोकप्रतिनिधी, पोलीस- जनता यांचा नेहमी सुसंवाद असल्यास सहज प्रश्न सुटून नेहमी शांतता जातीय सलोखा राहून न्याय मिळण्यास मदत होऊ शकते. असे प्रतिपादन पो. निरीक्षक हरिदास बोचरे सर यांनी व्यक्त केले.



यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार पो. नि. हरिदास बोचरे, पो. उप. निरीक्षक ढाकणे यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, ज्ञानेश्वर महाजन, अनिल आसेकर, विनायक जहुरे, प्रवीण धूंदले, विजय अवसमल, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 



याप्रसंगी भीमराव कोचुरे, शेख इद्रीस, कांतिलाल गाढे, अँड. सागर तायडे, सुमित पाटील, पुरुषोत्तम संघपाल, जमील शेख, प्रभाकर महाजन, दस्तगीर खाटीक, राहुल जैन, दस्तगीर खाटिक, प्रभाकर महाजन, राहुल जैन, रितेश चौधरी, सादिक पिंजारी, आशिष चौधरी, यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव तसेच पो. काँ. अविनाश पाटील, होमगार्ड, कर्मचारी आदि उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो. उप. निरीक्षक ढाकणे यांनी तर सूत्रसंचालन एम. के. तायडे व आभार प्रदर्शन अमोल वाघ यांनी केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 






Post a Comment

Previous Post Next Post