Khandesh Darpan 24x7

माता रमाई म्हणजे प्रज्ञा सूर्याची सावली आणि त्याग व समर्पणाचे दुसरे नाव : माजी नगरसेवक शाम अकोले



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा दि. ७ फेब्रुवारी रोजी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जयंती निमित्त आंबेडकर नगरात अभिवादन कार्यक्रम तथा दोन दिवसीय विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. 



कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावदा पोलीस स्टेशन चे सपोनी विशाल पाटील, पोनी अमोल गर्जे, माजी नगरसेवक श्याम अकोले यांची उपस्थिती लाभली. सुरुवातीला पाहुण्याचे हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करून कार्यक्रम ची सुरवात झाली.


सपोनी विशाल पाटील यांनी आपल्या मनोगतात "माता रमाई आंबेडकर यांचे कष्ट, परिश्रम, संयम, त्याग व समर्पण वृत्ती याबाबत प्रासंगिक उदाहरणे देवून त्यांचे कार्य स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, समाज कार्य, राष्ट्र सेवा व कार्य याकामी माता रमाई आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले आहे." असे प्रतीपादन केले. तर शाम अकोले यांनी "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्री चे योगदान असते. माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अखेर पर्यंत मोलाची साथ दिली. माता रमाई म्हणजे प्रज्ञा सूर्याची सावली होती. त्याग व समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे माता रमाई आंबेडकर होय." असे स्पष्ट केले. कार्यक्रमप्रसंगी युवा उद्दोजक विशाल तायडे, संजय तायडे वेडु लोखंडे, निरज  सोनवणे, निलेश बाविस्कर, जोजो तायडे, ऍड राजकुमार लोखंडे, बबन बडगे आदी मान्यवर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजु पटेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयोजक माता रमाई बुद्ध विहार समिती व सेतू सुविधा केंद्र यांनी परिश्रम घेतले.


माता रमाई जयंतीनिमित्त घेतलेल्या २ दिवसीय कार्यक्रमात महिला व मुलींसाठी वक्तृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धा व विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते यात  एकूण ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात ४५ छोट्या मुला मुलींनी डान्स मध्ये तर ३५ महिला व मुलींनी खेळात आपलं कौशल्य दाखविले. स्पर्धांमध्ये क्रमाक पटकावलेल्या तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना यथोचीत बक्षीस उपस्थित विशाल तायडे, संजय तायडे, वेडु लोखंडे, निरज सोनवणे यांचा हस्ते वितरण करण्यात आले.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

Previous Post Next Post