रक्तदान श्रेष्ठ दान आ. अमोल जावळे
प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे येथील रेणुका माता मंदिरात शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात अनेक युवकांनी रक्त दान केले.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन आ. अमोल जावळे, सरपंच निर्मलाबाई कोळी, उपसरपंच रंजना पाटील, कडू चौधरी यांच्या हस्ते करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आ. जावळे म्हणाले प्रत्येकाने रक्तदान करणे महत्वाचे असल्याचे सांगून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी दुर्गादास पाटील, प्रल्हाद बोंडे, दिगंबर चौधरी, गिरधर भंगाळे, डॉ. सुधाकर चौधरी, प्रशांत पाटील, राजू बोरसे, वाय. डी. पाटील, अनिल बराटे, चंद्रकांत भिरुड, अमोल खाचने, सचिन चौधरी, भूषण चौधरी, विक्की खाचणे, प्रमोद कोंडे, काशिनाथ शेलोडे, संदीप महाले, धनराज राणे, किशोर चौधरी, नंदिनी पंत, विजय सोनार रवींद्र महाले, प्रदीप कोंडे, रवींद्र बोंडे, भीमराव गिरडे, डॉ. दिलीप झोपे, डॉ. महेंद्र भालेराव, डॉ. जयेश वाणी, गोकुळ भोई, दिलीप सोनवणे, मनोहर तायडे, दस्तगीर खाटीक, यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी रेडप्लस ब्लड सेंटर जळगाव चे दिनेश भोळे, सूर्यांशी रवींद्र, शाहिद शेख, मिलिंद नांदे, निकिता पाटील व संयोजक परमानंद शेलोडे, आदित्य इखणकर, अक्षय दोडके, गिरीष कोळी यांनी परिश्रम घेतले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















Post a Comment