यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांना बसवणं आता शासनानं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहिम सुरु आहे. यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनानं यासाठीचं परिपत्रक काढलं आहे.
मुदतवाढीवर शासनानचं म्हणणं काय?
यासंदर्भात राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनानं मुदतवाढ का देण्यात येत आहे? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परिपत्रकात म्हटलं की, १ एप्रिल २०२९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच काम फारच कमी झालं आहे. त्यामुळं जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
या मुदतवाढीच्या अनुषंगानं सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. तसंच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावं, असं निर्देश या परिपत्रकातून देण्यात आले आहेत. २० मार्च २०२५ या तारखेनं हे मुदतवाढीचं परिपत्रक राज्य शासनानं काढलं आहे.
HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?
- HSRP नंबर प्लेट्स अशा पद्धतीनं बनवलेल्या असतात ज्यामध्ये कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणं कठीण आहे. त्यामुळं वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो.
- HSRP नंबर प्लेट्स चोरीची वाहनं आणि बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यात मदत करतात. त्यामुळं फसवणूक टाळता येते.
- HSRP नंबर प्लेट्समुळं अपघाताला कारणीभूत ठरलेलं वाहनं आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारं वाहनं ओळखण्यास मदत होते.
- HSRP नंबर प्लेट्सची इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदणी होते आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळं वाहन कोणाच्या मालकीचं आहे हे लगेच शोधता येतं.
- ही नंबर प्लेट तुम्हाला घरी बसवता येत नाही, कारण याला नट बोल्टचं फिटिंगला परवानगी नाही.
HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये?
- होलोग्राम : अशोक चक्राची प्रतिमा असलेला हॉट-स्टॅम्प केलेला क्रोमियम-आधारित होलोग्राम
- लेसर-एच्ड पिन: लेसर तंत्रज्ञान वापरून कायमस्वरूपी ओळख क्रमांक (पिन) कोरला जातो
- छेडछाड-प्रूफ स्नॅप लॉक : नंबर प्लेट बसवताना पुन्हा वापरता न येणारा रिबीट लॉक वापरला ज्यामुळं नंबर प्लेट कोणालाही काढता येत नाही, फक्त लॉक तोडूनच ती काढली जाऊ शकते.
- रिफ्लेक्टीव्ह शीटिंग: नंबर प्लेटवर रिफ्लेक्टीव्ह शीटिंग वापरण्यात आल्यानं अंधारातही तुमच्या वाहनाची नंबर प्लेट चमकते.
तसंच या नंबर प्लेटसाठी किती खर्च येतो? यासाठी नोंदणी कशी करायची? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
किती खर्च येतो?
दुचाकींसाठी...
नंबर प्लेटची मूळ किंमत ४०५ रुपये
फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये
होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये
एकूण किंमत - ५७५.०० रुपये
१८ टक्के जीएसटी - १०३.५० रुपये
अंतिम किंमत - ६७८.५० रुपये
तीन चाकींसाठी...
नंबर प्लेटची मूळ किंमत ४५५ रुपये
फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये
होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये
एकूण किंमत - ६२५.०० रुपये
१८ टक्के जीएसटी - ११२.५० रुपये
अंतिम किंमत - ७३७.५० रुपये
चार चाकी व जड वाहनांसाठी....
नंबर प्लेटची मूळ किंमत ७०० रुपये
फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये
होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये
एकूण किंमत - ८७०.०० रुपये
१८ टक्के जीएसटी - १५६.६० रुपये
अंतिम किंमत - १०२६.६० रुपये
नोंदणी कशी कराल?
अधिकृत महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वेबसाइट जा. https://transport.maharashtra.gov.in/1035/Home
वेबसाईट वर दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढे जा. पुढे जाताना खालील माहिती देत जा.
तुमच्या वाहनावर आधारित प्लेटचा प्रकार निवडा.
नोंदणी क्रमांक, चासी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि वाहन मालकाच्या तपशीलांसह वाहनाचा तपशील भरा.
आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
विहित शुल्क ऑनलाइन भरा.
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा.
नियोजित तारखेला, तुमचं वाहन आणि आवश्यक कागदपत्रांसह फिटमेंट सेंटरला भेट द्या किंवा तुम्हाला घरी येऊन पाटी बसवण्याचीही सुविधा मिळेल.
या तपशीलाची काळजी घ्या
वाहन आणि फोनचा तपशील वाहन पोर्टलवरील तपशीलाशी जुळला पाहिजे
HSRPची किंमत वाहनाच्या प्रकारानुसार बदलते
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
सौजन्य : दै. सकाळ
येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















Post a Comment