Khandesh Darpan 24x7

टेरेसवरील स्विमिंग पूलमध्ये रोमांस करत होतं जोडपं, अचानक भूकंप आला आणि घडला विचित्र प्रकार Video





खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  



भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्याखाली अनेक लोक गाडली गेल्याची माहिती मिळतेय. सध्या म्यानमार आणि थायलंड येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


म्यानमार आणि थायलंड येथे झालेल्या भूकंपामुळे अक्षरशः होत्याच नव्हतं झालं. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1644 वर पोहोचली असून तीन हजारहून अधिक जण जखमी आहेत. भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्याखाली अनेक लोक गाडली गेल्याची माहिती मिळतेय. 


म्यानमार येथे युद्ध पातळीवर मदत कार्य केलं जात असून भारताने देखील मदतकार्यासाठी ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात केली आहे. NDRF च्या 80 सदस्यांची टीम, दोन वायुसेनेची विमान तसेच भरपूर जीवनावश्यक सामग्री म्यानमारला पाठवण्यात आली आहे. सध्या म्यानमार आणि थायलंड येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



म्यानमारमध्ये शनिवारी दुपारी 2.50 वाजता भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी होती. म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या 1,644 झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास 3,408 लोक यात जखमी आहेत. तसेच 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. सध्या या भूकंपाची तीव्रता दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ टेरेसवरील स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करणाऱ्या कपलचा आहे. भूकंप येताच कशा प्रकारे होत्याच नव्हतं झालं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.



व्हिडिओ व्हायरल :

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे एका गगनचुंबी इमारतीच्या छतावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये एक कपल रोमान्स करत होतं. तर एक व्यक्ती बाहेर खुर्चीवर बसून आराम करत होता. दरम्यान व्यक्तीला भूकंपाचा तीव्र झटका बसल्याचे जाणवले आणि तो एकदम उठून उभा राहिला. तर भूकंपामुळे स्विमिंग पूलमधील पाणी लाटांप्रमाणे उडू लागले. हे पाहून स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करणार कपल घाबरलं आणि ते स्विमिंग पूलमधून लगेचच बाहेर आले.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा. 



भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा :


म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा मोहीम सुरु करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त लोकांची मानवतावादी मदत करण्यासाठी ही मोहीम असून या अंतर्गत तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह 15 टन मदत सामग्री भारताकडून यंगूनला पाठवण्यात आली आहे. 


भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री जवळपास 40 टन सामग्री घेऊन मदत घेऊन यंगून बंदराच्या दिशेने निघाली आहेत. भारतासह न्यूझीलंडने देखील म्यानमारला दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर चीन आणि रशियानेही मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 

सौजन्य : झी २४ तास  





Post a Comment

Previous Post Next Post