प्रतिनिधी | वरणगाव
श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर वरणगाव येथे नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात सपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी किशोर झोपे तर प्रमुख पाहुणे शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय राम चौधरी, संस्थेचे जॉईन सेक्रेटरी अमित चौधरी, संचालक मोरेश्वर फिरके, गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. चौधरी, पर्यवेक्षक अविनाश देशमुख, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी तसेच पालकशिक्षक संघाचे माजी अध्यक्ष किरण पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या व नाथांच्या प्रतिमेस हार अर्पण करून झाली. प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये अक्षय राम चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात ध्येय कसे गाठावे हे सांगितले. त्याचप्रमाणे शाळेसाठी रुपये ११,१११/- ही रोख रक्मक देणगी म्हणून दिली आहे. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक वर्गात प्रथम येण्याऱ्या विद्यार्थ्यास रुपये १०१, द्वितीय येण्याऱ्या विद्यार्थ्यास रुपये ७१, तृतीय येण्याऱ्या विद्यार्थ्यास रुपये ५१ असे बक्षीस जाहीर केले. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गातून एक असे एकूण चार गरीब व होतकरू विद्याथ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय गणवेश देण्याचे जाहीर केले.
प्रसंगी गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. चौधरी यांनी सुद्धा इयत्ता पहिली ते तिसरी या वर्गांत प्रथम येण्याऱ्या विद्यार्थ्यास रुपये १०१ आणि इयत्ता चौथीतून प्रथम येण्याऱ्या विद्यार्थ्यास रुपये २५१ असे बक्षीसे जाहीर करून उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विजयकुमार झोपे यांनी तर आभार योगिता वसावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.



















Post a Comment