प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या इयत्ता १२ वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दि. ५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आला. त्यात सावदा शहरातील पालिका संचालित श्री आ.गं.हायस्कुल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला असून निकाल खालील प्रमाणे -
१२ वी विज्ञान शाखेत
कोष्टी अनुष्का रमाकांत हिने ५०७ गुण (८४.५०%) मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर
सापकर पूर्वा दीपक हिने एकूण ५०२ (८३.६७%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
१२ वी कला शाखेत
वाघ साक्षी अनिल हिने ४१४ गुण (६९.००%) मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर
चंडाले सिमरन विजय हिने एकूण ४१२ (६८.६७%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
१२ वी विज्ञान शाखेत एकूण १२६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी १२६ उत्तीर्ण झालेले आहेत.
कला शाखेत एकूण ८७ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी ६३ उत्तीर्ण झालेले आहेत.
दोन्ही मिळून एकूण २१३ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी १८९ उत्तीर्ण झालेले आहेत. या शाळेचा एकूण निकाल हा ८८.७३% लागलेला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे न. पा. प्रशासक तथा प्रांत अधिकारी बबनराव काकडे, गटशिक्षणाधिकारी रावेर विलास कोळी, मुख्याधिकारी भूषण वर्मा, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |




















Post a Comment