Khandesh Darpan 24x7

“जाणीव पुरस्कार” - हा पुरस्कार मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित करेल : ऋषिकेश पाटील

सावद्याचे ऋषिकेश पाटील राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार”ने सन्मानित 



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा येथील ओम कोल्ड स्टोरेज चे संस्थापक, युवा उद्योजक ऋषिकेश पाटील यांना जाणीव सांस्कृतिक अभियान व राष्ट्रीय उपक्रमशील संस्था नाशिक (संस्थापक अध्यक्ष शिवश्री जगन्नाथ माधवराव पाटील) च्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार” प्रदान सोहळा २०२४ गंधे सभागृह जळगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात इतिहासाचार्य तथा जिजाऊ फेम प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख आणि पाचोऱ्याचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  "" जाणीव पुरस्काराने ""  गौरविण्यात आले.



प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक रत्नाकर बळीराम चौधरी हे होते, तर प्रमुख अतिथी निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष देविदास (बापू) बोरसे, तसेच बोईसर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे यांची तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, सचिव गौरव थोरात आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी तर संस्थेचे अध्यक्ष शिवश्री जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.



प्रसंगी आपल्या मनोगतात युवा उद्योजक ऋषिकेश पाटील यांनी "आज मला हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मी या पुरस्कारासाठी माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या गुरुजींना धन्यवाद देतो. माझ्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण मी कधीही हार मानली नाही. मला खात्री आहे की हा पुरस्कार मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित करेल." असे विचार मांडले.


सावदा येथील ओम कोल्ड स्टोरेज चे संस्थापक तथा युवा उद्योजक ऋषिकेश पाटील यांना राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार” मिळाल्या बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post