प्रतिनिधी | थोरगव्हाण
थोरगव्हाण ता. रावेर येथे शाळेचे शैक्षणिक सत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरु झाले. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम १६ जून सोमवार रोजी सकाळी ११ वाजता दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण चे संचालक व शालेय समितीचे सदस्य नंदकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेतील निधन झालेल्या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्येची देवता सरस्वती पूजन व माल्यार्पन कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले.
प्रवेशोत्सव निमित्ताने शाळेचे प्रवेशद्वार केळीचे खांब, तथा आंब्याची पानांचे तोरणे तसेच सुंदर रांगोळीने आकर्षक पद्ध्तीने खुलवण्यात आले होते. इयत्ता ५ वी च्या नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक रविंद्र चौधरी (गोविंद काकाश्री), गावचे पोलिस पाटील अरविंद झोपे, पालकसंघाचे संतोष राणे, विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. जे. कुरकुरे यांनी केले. मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आपल्या दातृत्वातून सर्व विद्यार्थी व उपस्थितांना गोडवा म्हणून जिलेबी वाटप केली.
नविन विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत व इतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करत या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व नावियपूर्ण प्रवेशोत्सव कार्यक्रम घडवून आणला नियोजन केले . मान्यवर यांचे हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले .
“आज शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाचा मला अभिमान वाटतो. या शैक्षणिक वर्षात देखील ५ वी तील सर्वविद्यार्थ्यांना मोफत दप्तर, शालेय वह्या तसेच शाळेची मोफत बससेवा सुरु असणार असून सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. शाळेची बस ही तुमच्या साठी मोफत असून ती नीट सांभाळणे ही सर्वांची जबाबदारी असते." असे मनोगत अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी व्यक्त केले.
कलाशिक्षिक एस. बी. सपकाळे यांनी सभेसाठी मुख्य दर्शनी फलक लेखन केले. कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ शिक्षक टी. पी. घुले तसेच वाय. जे. कुरकुरे, एम.के. पाटील, के. एम. पाटील , सौ. जयश्री प्रविण चौधरी, सौ. नयना ज्ञानेश्वर पाटील यांचे सह सर्व शिक्षक बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढवला.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





















Post a Comment