प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
भुसावळ येथील खाचणे हॉल येथे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भोरगाव लेवा पंचायत पाडळसे विभाग भुसावळ यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्याचे सहकार वस्त्रद्योग व पणनमंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उल्हासात पार पडला.
प्रसंगी या सोहळ्यास कुटुंबप्रमुख ललित रमेश पाटील, अध्यक्ष सुहास गोपाळराव चौधरी, सचिव सुभाषचंद्र मधुकर भंगाळे, कोषाध्यक्ष सौ. भारती चौधरी, परिक्षित बऱ्हाटे व प्रमोद नेमाडे यांची उपस्थिती होती.
या गुणगौरव सोहळ्यात थोरगव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. थोरगव्हाण. ता रावेर चे सचिव ज्ञानेश्वर पाटील तथा डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय थोरगव्हाणच्या उपशिक्षिका नयना ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र यश ज्ञानेश्वर पाटील यास इयत्ता दहावी सी. बी. एस. सी. बोर्ड परीक्षेत शेकडा ९३.२० टक्के गुण प्राप्त झाल्याने सहकार वस्त्रद्योग व पणनमंत्री संजय सावकारे यांचे हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यश पाटील च्या अनुपस्थितीत त्याची आई नयना ज्ञानेश्वर पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला.
या सोहळ्यासाठी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे येथील सर्व पदाधिकारी तसेच संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे उपस्थितानी कौतुक करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
घवघवीत यश मिळविलेल्या यश पाटील वर समाजातील सर्व थरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.


















Post a Comment