Khandesh Darpan 24x7

शुभांशू शुक्ला अंतराळात झाले ‘वॉटर बेंडर’, पृथ्वीवर येण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर अशस्वी रित्या परतले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून निघण्यापूर्वी त्यांनी शून्य गुरुत्वाकर्षणात पाण्याचे खेळ करून दाखवले.



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाण्याच्या गोळ्यावर प्रयोग करून दाखवला.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर परतीचा प्रवास तब्बल २२ तासांचा प्रवास करून अशस्वी रित्या पृथ्वीवर परत आलेले आहेत. शुभांशू शुक्ला आणि ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील तीन क्रू सदस्य हे जवळपास १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले.


दरम्यान पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी शून्य गुरुत्वाकर्षणात पाण्याबरोबरचे खेळ करून दाखवले. हा खेळ करताना ते स्वतःला ‘वॉटर बेंडर’ म्हणवून घेतात. शुभांशू शुक्ला यांनी विनोदी अंदाजात हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. व्हिडीओमध्ये पाण्याचा एक गोळा हवेत तरंगताना दिसत आहे.


शुभांशू शुक्ला व्हिडीओत म्हणाले की, "हा खूपच रोमांचकारी अनुभव आहे. आम्ही इथे अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात व्यस्त आहोत. पण कामातून जेव्हा केव्हा थोडा वेळ मिळतो, तेव्हा मी खिडकीजवळ जाऊन फोटो काढतो."









शून्य गुरुत्वाकर्षणात केले पाण्याचे खेळ


आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील ज्येष्ठ सदस्य आणि अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसनही यावेळी शुभांशू शुक्ला यांच्याबरोबर दिसत आहेत. शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, "गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे मोकळ्या जागेतील ताण अधिक प्रबळ होतो, त्यामुळे पाणी शून्य गुरुत्वाकर्षणामुळे गोळ्याच्या रुपात बदलते."



समोरापावेळी भावुक झाले शुक्ला

दरम्यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा निरोप घेत असताना शुक्ला भावुक झालेले पाहायला मिळाले. “आपल्या समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, अंतराळातून भारत खूपच चांगला दिसतो. अतिशय अविश्वसनीय असा हा प्रवास होता”, असे ते म्हणाले.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 सौजन्य : दै.लोकसत्ता 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

Previous Post Next Post