Khandesh Darpan 24x7

सावदा येथे संपन्न झाला समाजाला आरसा दाखवणारा लग्न सोहळा!



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


नुकतेच सावदा येथील मदिना नगर मध्ये आयोजित एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात वर आणि वधू कडील मंडळी सह उपस्थित समाजातील मान्यवरांनी आपसात चर्चा करून, सदर कार्यक्रमात वेळ, अधीकचा खर्च, थाट, वाद्य, महागडे डेकोरेशन व भव्य विविध प्रकारचे जवण अशा सर्व गोष्टींना टाळून इस्लाम धर्माच्या शिकवण अनुसार अतिशय सोप्या व साध्या पद्धतीने लग्न लावण्याचा चांगला निर्णय घेतला.



यामुळे वर आणि वधू कडील मंडळी व उपस्थित सर्व नातेवाईकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले. सावदा ता. रावेर येथील सुबाहान शाह मस्तान शाह यांची सुकन्या "शिरीनबी" हीचे लग्न भुसावळ येथील जाकीर शाह यांचे चिरंजीव "इम्रान शाह" यांच्या सोबत इस्लाम धर्माची प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने संपन्न झाला.



परिणामी वर आणि वधू यांच्या मंडळी सोबत यशस्वी चर्चा करून सदर साखरपुड्याचे रुपांतर थेट लग्नात करण्यामध्ये हाजी रहीम शाह, हाजी युनूस शाह, जळगाव चे फिरोज शाह, मुक्ताईनगर चे जफर अली, उस्मान शाह ग्रिनपार्क, शरीफ शाह मेकॅनिकल, रजा शाह, कलिम अली, फारुख अली सावदा, अस्लम शाह किराला व महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी युसूफ शाह व फरीद शेख यांनी केलेले  प्रयत्न व परिश्रम सफल झाले. 



तरी या समाजाला आरसा दाखवणाऱ्या सदरील लग्न कार्यक्रम पासून इतरांनी बोध घेऊन लग्न  साध्या पद्धतीने करण्यासाठी रुची ठेवणे काळाची गरज असून, यात समाजातील श्रीमंत, सुज्ञ व शिक्षित वर्गाने पुढाकार घेतला तर याचे अणूकरण आपल्यातील गोरगरीब करण्या मध्ये मागेपुढे पाहणार नाही. आणि हीच गोष्ट सर्व समाजासाठी तारक ठरणार असल्याचे मत यावेळी जागरुकानी मांडले.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post