Khandesh Darpan 24x7

अंतराळातून भारत नेमका कसा दिसतो? पंतप्रधान मोदींशी बोलताना शुभांशू शुक्ला यांनी केलं वर्णन

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.





खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शुभांशू शुक्ला हे पंतप्रधान मोदी यांनी अंतराळात त्यांनी अनुभवलेल्या गोष्टींबद्दल माहिती देताना दिसत आहेत. यावेळी अंतराळातून भारत कसा दिसतो याबद्दल देखील शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.




या संभाषणा दरम्यान अंतराळाची विशालता पाहून डोक्यात सर्वात पहिला विचार काय आला होता? असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी शुभांशू यांना विचारला. यावेळी गुप्ता यांनी उत्तर देताना सांगितले की, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा अंतराळात पोहचलो तेव्हा पहिले दृष्य हे प्रथ्वीचे होते. पृथ्वीला बाहेरून पाहून पहिला विचार हा आला की, पृथ्वी पूर्णपणे एक दिसते. बाहेरून कोणतीही सीमारेषा दिसत नाही. दुसरी गोष्ट लक्षात येत होती, जेव्हा पहिल्यांदा भारताला पाहिले… जेव्हा आपण भारताला पाहतो तेव्हा नकाशावर पाहतो, आपण पाहतो की दुसऱ्या देशांचा आकार किती मोठा आहे आणि आपल्या देशाचा आकार किती आहे. ते आपण नकाशावर पाहतो, पण ते योग्य नसते. कारण आपण एका थ्री-डी वस्तुला टू-डी म्हणजे कागदावर रेखाटलेले असते. भारत खरंच खूप भव्य, खूप मोठा दिसतो. जितका आपण नकाशावर पाहतो त्यापेक्षा खूप मोठा…” असे शुभांशू यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.


पुढे बोलताना शुभांशू म्हणाले की, “…जी पृथ्वीच्या एकतेची (Oneness) भावना आहे, जे आपलं बोधवाक्य देखीलआहे की ‘अनेकता मे एकता’, त्याचं महत्व बाहेरून (पृथ्वीला) पाहिल्यानंतर लक्षात येतं. असं वाटतं की कोणती सीमा, राज्य, देश अस्तित्वातच नाहीत. आपण सगळे मानवतेचा भाग आहोत आणि पृथ्वी हे आपलं घर आणि आपण सर्वजण याचे नागरिक आहोत.”


ISS वर जाणारे पहिले भारतीय

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे मिशन पायलट असलेले शुक्ला हे आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय आणि १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय आहेत.

शुक्ला हे अ‍ॅक्सिओम-४ मोहिनेचे वैमानिक आहेत, जे नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरवरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाडे बुधवारी झेपावले होते. शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळ यानातून १४ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आयएसएसवर गेले आहेत. तसेच अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेसाठी मंजूर झालेल्या सात भारतीय प्रयोगांपैकी एक ‘व्हॉयेजर टार्डिग्रेड्स’ हा प्रयोग अशून सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत या सूक्ष्म जीवांचा अभ्यास प्रयोगामध्ये केला जाणार आहे. आयएसएसवर केला जाणारा व्हॉयेजर टार्डिग्रेड्स प्रयोग हा पूर्वीच्या अभ्यासांवर आधारित आहे.


https://www.loksatta.com/desh-videsh/shubhanshu-shukla-tells-pm-modi-how-india-looks-from-space-station-axiom-4-mission-watch-video-rak-4-5190400/

या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 सौजन्य : दै.दिव्य मराठी



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post