Khandesh Darpan 24x7

जळगावात रुळावर रील्स बनवताना 2 अल्पवयीन मुले रेल्वेच्या धडकेत ठार

जळगावात रुळावर रील्स बनवताना 2 अल्पवयीन मुले रेल्वेच्या धडकेत ठार :धरणगाव तालुक्यातील घटना, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने चिरडले.

जाहिरात :  राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा  (https://youtu.be/Ngpky2CVTWM)  - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -

धावत्या रेल्वेसमाेर माेबाइलवर रील्स बनवणे दोन अल्पवयीनांच्या जिवावर बेतले. पाळधी-चांदसर (ता. धरणगाव, जि. जळगाव) रेल्वे गेटजवळ रविवारी सकाळी १०.१५ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. प्रशांत पवन खैरनार (१५) व हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (१६, दाेन्ही रा. महात्मा फुलेनगर, प्लाट भाग, पाळधी, ता. धरणगाव) अशी मृतांची नावे आहेत. ते नात्याने चुलत मामा-भाचे हाेते.




जाहिरात :  साई डेअरी आणि कोल्ड्रिंक्स (https://youtu.be/EWXxirDpWgQ)   - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 


प्रशांत मूळचा मालेगाव येथील असून त्याच्या वडिलांनी पाच-सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर प्रशांत आई, माेठा भाऊ, २ बहिणींसह पाळधीत राहण्यास आला हाेता. ताे पाळधीतील हायस्कूलमध्ये चुलत मामा हर्षवर्धन नन्नवरेसाेबत शिक्षण घेत हाेता. दाेघांमध्ये घट्ट मैत्री हाेती. रविवारी दाेघे रेल्वे रुळावर रील्स बनवत असताना धरणगावकडून येणाऱ्या अहमदाबाद-हावडा (क्र. १२८३३) एक्स्प्रेसखाली चिरडले गेले. लाेकाेपायलटने घटनेबाबत रेल्वेस्थानकाला माहिती दिली.


यादरम्यान रेल्वेगाडी अर्धा ते पाऊण तास घटनास्थळापासून काही अंतरावर थांबून हाेती. रविवारी सकाळी ९ वाजता रुळावर रील्स बनवणाऱ्या अन्य २ तरुणांना हाकलून लावले हाेते, अशी माहिती गँगमन अमरदीप यांनी दिव्य मराठीला दिली.


जाहिरात :  प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर, दुर्गामाता चौक, सावदा (https://youtu.be/Vx4iGbBdZ2s)   - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 


बातमीतून धडा

धाेकादायक ठिकाणी रील बनवण्यांचे मुलांत फॅड वाढले आहे. त्यातून अनेक अनुचित घटना घडतात. पालकांनी धाेकादायक ठिकाणी न जाण्याबाबत पाल्यांना समज द्यावी.



या बातमीचे प्रायोजक आहे.

सावद्यातील  स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे  : राधाकृष्ण संकुल  
संपर्क : विलास यशवंतराव पाटील ७५८८८१५१६६ , सागर विलास पाटील ८३२९८३९१७८    



  


सहप्रायोजक आहे.  

  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

Previous Post Next Post