कोजागिरी
लख्ख चांदणे चमचम करते शारद रात्री आकाशी
युगायुगाची गाठ रेशमी चंद्रकलेशी चंद्राची
डोकावताच ढगातून तो हळूच बघतो प्रेमाला
प्रेम भावना फुलुनी येते तारांगणात चंद्राची
लख्ख चांदणे आकाशीचे बघत नववधू बावरते
सखयाच्या मग बाहूपाशी लाजत लाजत ती शिरते
प्रित दोघांची चांदण्यातील रात्री येते बहराला
प्रेमामधले अंतीम टोक सहज गाठले ते जाते
तेज वेगळे चंद्राचे ते न्हाऊ घालते धरतीला
सृजन सोहळा तो मिलनाचा सुखवत असतो नयनाला
झाडे वेली झुलता झुलता गाती गाणे प्रेमाचे
प्रेमाचे मग येते भरते कोजागिरीस रात्रीला
दुग्ध शर्करा घेते उकळी गच्चीवरती प्रेमाने
येते शोभा सोहळ्यात तालासुरातील गाण्याने
घेता हाती हात दुजाचा रिंगण करती आनंदे
रात्र जागते सृष्टीसंगे चांदण्यात आनंदाने
- माधुरी चौधरी वाघुळदे संभाजीनगर
९४२१८६०८७३
अशा कविता किंवा लेख फोटोसह प्रसिध्द करण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
९४२३१८९५७२, ९८३४०४९२९७ ,९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा








Post a Comment