प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील रविवार पेठ कुरकुरे वाडा या भागातील सालाबादप्रमाणे पुरातन म्हाळसादेवी मंदिरात कळण्याच्या भाकरी आणि ठेचा (७ क्विंटल कळण्याच्या भाकरी, ५ किलो जाड मिरची चा ठेचा आणि १५ किलोचे १२ डबे) यांचा महाप्रसाद वाटण्यात आला. दर वर्षी प्रमाणे दीपावली नंतर या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
जाहिरात : प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर, दुर्गामाता चौक, सावदा (https://youtu.be/Vx4iGbBdZ2s) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
या आयोजनातून म्हाळसा देवी वरील भक्ती आणि ग्रामस्थांची एकजूट दिसून येते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास म्हाळसा देवीची आरती होऊन भंडाऱ्याच्या कार्यक्रम ला सुरुवात झाली. म्हाळसाईच्या दर्शनासाठी तथा प्रसादासाठी केतकी पाटील, सावदा सापोनी विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची उपस्थिती लाभली.
जाहिरात : साई डेअरी आणि कोल्ड्रिंक्स (https://youtu.be/EWXxirDpWgQ) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
पुरुष आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून लोक सहभागातून या भंडाऱ्याची ग्रामस्थांनी परंपरा जपली आहे. जवळपास ५००० च्या वर भाविकांनी या ठेचा भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला.
जाहिरात : राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा (https://youtu.be/Ngpky2CVTWM) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
मंदिरात संपूर्ण नवरात्रात सकाळी, संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या भंडाऱ्यासाठी प्रामुख्याने मंदिराचे विश्वस्त हरी इंगळे, मयूर देवकर, विश्वनाथ फालक, अतुल नेहेते, धनु कुरकुरे, खेमा कुरकुरे तसेच स्वयंपाकी प्रकाश पाटील, उमाकांत नेहेते भीमा नेमाडे यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले. मंदिरात वर्षभरात वेळोवेळी होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी देवा मसाले यांचे संचालक अजय चौधरी यांचे योगदान प्रामुख्याने मिळत असते.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













Post a Comment