Khandesh Darpan 24x7

निंभोरा येथे दुर्गा उत्सव मिरवणुकीत गाणे का लावले यावरून वाद....


प्रतिनिधी | निंभोरा 


रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत पार पडत असताना घरकुल परिसरातील दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीतील बँड मध्ये  हे गाणे का लावले असे म्हणून काही तरुणांनी वाद व शिवीगाळ केल्याने दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ संतप्त झाले होते परंतु लागलीच निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नी हरिदास बोचरे, फौजदार अभय ढाकणे व निंभोरा पोलीस व होमगार्ड यांनी मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. याबाबत  गोविंदा गणेश जोगी, निंभोरा यांनी फिर्याद दिल्याने तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली यात जुबेर आलमगीर खान, अर्शद शेख मुख्तार, फरदीन फिरोज खान सर्व राहणार निंभोरा बु: (घरकुल परिसर) यांना ताब्यात घेऊन निंभोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात निंभोरा पोलीस अधिक तपास करीत आहे. हा प्रकार वगळता दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत व उत्साहात पडली.


निंभोरा पोलिस प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार घटना समजताच रावेर तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळ अधिकारी रवी वानखेडे तसेच फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी निंभोरा येथे भेट दिली. 



अफवांवर विश्वास ठेवू नये स.पो.नी हरिदास बोचरे 


निंभोरा व परिसरातील ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट टाकू नये असे आवाहन केले.


या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




सहप्रायोजक आहे.  

  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post