खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
![]() |
| मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडियो शिनबॉम यांनी संसदेच्या मंजुरीनंतर भारत, चीन, थायलंड आणि इंडोनेशियासह अन्य देशांवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. |
मेक्सिकोच्या संसदेने ज्या देशांसोबत 'फ्री ट्रेड अॅग्रीमेंट' म्हणजेच एफटीए नाहीये, त्या देशांवर ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका भारत, चीन, थायलंड आणि इंडोनेशियासह अनेक आशियाई देशांच्या निर्यातीला बसणार आहे. या देशांमधून मेक्सिकोला होणारी निर्यात आता महाग होईल.
मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडियो शिनबॉम यांनी सांगितलं की, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय आवश्यक होता.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, मेक्सिकोच्या या निर्णयाने भारतात काम करत असलेल्या फॉक्सवॅगन आणि ह्युंदाईसारख्या ऑटो कंपन्याच्या कार निर्यातीवर परिणाम होईल. या कंपनीची भारतातून होणारी निर्यात जवळपास ९ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
भारताच्या कार निर्यात क्षेत्राला फटका
रॉयटर्सच्या वृत्तानुसार भारतातून निर्यात होणाऱ्या कारवरील टॅरिफ २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याचा परिणाम फॉक्सवॅगन, ह्युंदाई आणि मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या निर्यातीवर होईल. भारतातून मेक्सिकोला सर्वाधिक कार निर्यात याच कंपन्यांकडून केली जाते. दक्षिण आफ्रिका आणि सौदी अरबनंतर मेक्सिको भारतीय गाड्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कार उद्योगाची प्रातिनिधीक संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियामने) वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केली आहे की, भारतातून निर्यात होणाऱ्या गाड्यांवर सध्याचेच टॅरिफ दर लागू करावेत, अशी विनंती मेक्सिकोला करण्यात यावी.
![]() |
फॉक्सवॅगनच्या भारतीय युनिटमधील कार जोडणी (असेम्बलिंग) |
सियामने वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने मेक्सिकोला ५.३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. त्यामध्ये कारचा वाटा हा १ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ९ हजार कोटी रुपयांचा असल्याचं रॉयटर्सने म्हटलं आहे. भारतातून मेक्सिकोत निर्यात करण्यात आलेल्या एकूण गाड्यांपैकी ५० टक्के गाड्या या स्कोडाच्या आहेत.
ह्युंदाईने २० कोटी डॉलर, निसानने १४ कोटी डॉलर आणि सुझुकीने १२ कोटी डॉलर्सच्या गाड्या मेक्सिकोला निर्यात केल्या आहेत. गेल्या महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कार उत्पादकांनी म्हटलं की, भारतातून मेक्सिकोला निर्यात होणाऱ्या बहुतांश गाड्या या लहान आहेत. या गाड्या मेक्सिकोच्याच बाजारपेठेचा विचार करून तयार केल्या जातात, अमेरिकेला निर्यात करण्यासाठी नाही.
कार कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितलं की, मेक्सिकोत दरवर्षी जवळपास १५ लाख पॅसेंजर गाड्यांची विक्री होते. त्यांपैकी दोन तृतीयांश गाड्या मेक्सिको आयात करतो.
अमेरिकेचा मेक्सिकोवर दबाव?
मेक्सिकोने जाहीर केलेले नवीन टॅरिफ १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. हे टॅरिफ कार, धातू, कपडे आणि इतर घरगुती वस्तूंवर लागू होईल. मेक्सिकोने आशियाई देशांवर ५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे टॅरिफ लावले आहे. यामध्ये आशियाई देशांमधून मेक्सिकोला पाठवल्या जाणाऱ्या सुमारे १,४०० वस्तूंचा समावेश आहे.
या मेक्सिकन शुल्कामुळे व्यावसायिक हितसंबंधांना मोठा फटका बसेल, असं चीननं म्हटलं आहे. मेक्सिको सध्या अमेरिकेशी व्यापार करारात गुंतलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन निर्यातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता. आता मेक्सिकोने चीनविरुद्ध ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेत चीनची निर्यात रोखण्याचे ट्रम्प यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, असं मानलं जातं.
"चिनी कंपन्या मेक्सिकोमध्ये उत्पादन युनिट्स स्थापन करून अमेरिकेत त्यांचे सामान विकण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप अमेरिकेने केला आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक बीआयडी आणि एमजी यांनी अलीकडेच मेक्सिकोमध्ये त्यांचा उद्योग वाढवला आहे. चीन अमेरिकेच्या करांपासून वाचण्यासाठी मेक्सिकोचा वापर करू शकतो, असंही अमेरिकेचं म्हणणं आहे.
टॅरिफच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या वाढत्या दबावानंतर मेक्सिकोने अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच स्टील आणि अॅल्युमिनियमसह अनेक मेक्सिकन वस्तूंवर ५० टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी याशिवाय आणखी टॅरिफ लावण्याचाही इशारा दिला आहे. यात अमेरिकेत सिंथेटिक ड्रग फेंटॅनिलचा पुरवठा होऊ नये यासाठी अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याचा समावेश आहे.
अमेरिकन शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठीच्या कराराचे मेक्सिको उल्लंघन करत आहे, असा आरोप करत ट्रम्प यांनी ८ डिसेंबरला मेक्सिकोवर नव्यानं ५ टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती. नव्यानं लादलेल्या टॅरिफमुळे पुढील वर्षी मेक्सिकोला अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलरचा अतिरिक्त महसूल मिळेल.
मेक्सिकोच्या अध्यक्ष सेनबॉम यांनी सप्टेंबरमध्ये संसदेत टॅरिफ वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, आशियाई देश, व्यावसायिक लॉबी आणि विरोधकांच्या दबावामुळे तो मंजूर होण्यास विलंब झाला. मेक्सिकोचे उत्पादन क्षेत्र चीन, भारत आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांवर अवलंबून आहे.
या करांमुळे त्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ होईल. यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका आहे, असं मेक्सिकन उद्योगपती म्हणत आहेत.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















Post a Comment