नूतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गीता जयंतीचा भव्य आणि भावपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भगवद्गीतेच्या महत्त्वाचे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावे, यासाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षिका माधुरी महाजन, रूपाली तळेले यांनी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नूतन आयटीआयचे प्राचार्य संदीप चौधरी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि मंत्रोच्चारांनी झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनाला भारावून टाकणारे भगवद्गीतेतील श्लोकांचे सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या अध्यायांवरील विचार मांडत गीतेचे तत्त्वज्ञान आजच्या जीवनाशी जोडून सांगितले.
शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी कृष्णलीला नाटिका सादर केली. संपूर्ण सभागृहात आनंदाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले. तर काही विद्यार्थ्यांनी “गीता आणि आधुनिक जीवन” हा विषय घेऊन भाषणे व निबंध सादर केले. शिक्षिका उज्ज्वला टोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गीतेचे सांस्कृतिक, मानवी मूल्ये आणि नैतिकतेशी असलेले नाते स्पष्ट केले.
कार्यक्रमात दिपाली सरोदे सांगितले की, “भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन कसे जगायचे, संकटसमयी योग्य निर्णय कसा घ्यायचा आणि कर्तव्यनिष्ठ राहण्याचे महत्त्व काय—हे शिकवणारा सार्वकालिक मार्गदर्शक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना गीतेतील शिक्षण आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शिक्षकवृंद, लिपिक वैभव महाजन, विद्यार्थी तसेच पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना नेहेते यांनी केले तर शिक्षकांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
गीता जयंती निमित्त शाळेत दिवसभर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरण फुलून गेले होते.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













Post a Comment