Khandesh Darpan 24x7

भावाच्या अंतदर्शनाला आलेल्या बहिणीने सोडला जीव




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा शहरात काल एक दुर्दैवी घटना घडली. शरीरातील जगदीश प्रल्हाद महाजन या व्यक्तीचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही बातमी त्यांची ६८ वर्षीय भुसावळ शहरात वास्तव्याला असलेली बहीण श्रीमती सुशीलाबाई बोरोले यांना कळाली. 





बहिणीने क्षणाचाही विलंब न लावता त्रागा करत सावदा शहराकडे आपल्या भावाच्या अंतदर्शनासाठी लगबगीने धाव घेतली. भावाच्या घरी पोहोचल्यावर एकच हंबरडा फोडला. भावाचे अंतदर्शन घेण्यासाठी त्याच्या पायावर मस्त ठेवले आणि आपले प्राण त्यागले. बहिणीला तात्काळ इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.





हा एक अत्यंत दुर्दैवी, भावनिक आणि अविश्वसनीय असा क्षण आहे जिथे दोन जीव एकाच वेळी वेगळे झाले. भावावर असलेले अतोनात प्रेम आणि आपुलकी यातून दिसून येते. भावाला अखेरचा निरोप देतानाच प्राण सोडणे, हे त्यांच्यातील घट्ट नात्याची साक्ष देते.



एकाच वेळी दोन भावंडाचा मृत्यू होणे, या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली. अशा घटनांवर विश्वास ठेवणे कठीण असते, पण कधीकधी नियती अशा हृदयस्पर्शी आणि दुःखद घटना घडवते. अशा हृदयस्पर्शी परिस्थितीत निधन झाल्याने सावदा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



भुसावळ ला श्रीमती सुशीलाबाई बोरोले यांच्यावर तर सावदा येथे जगदीश महाजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



"खान्देश दर्पण २४x७"  तर्फे दोन्ही पुण्यात्म्यांना चिरशांती लाभो हिच परमेश्वर चरणी सदिच्छा. 



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



  

सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post