Khandesh Darpan 24x7

निमजाय माता मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न

दरवर्षा प्रमाणे यावर्षी सुद्धा शाकंभरी पोर्णिमा निमित्त सावदा येथील निमजाय माता मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



निमजाय माता मंदिर साधारण १२५ वर्षापुवीचे पुरातन असून सावदा आणि परिसरातील सर्व हिंदू जाती जमातीचे श्रद्धा स्थान आहे. हे मंदिर मस्कावद रोड ला लागून आहे. लेवापाटील समाजाचे हे कुलदैवत असून येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.





मोठ्या शहरात स्थित सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपले मानलेले नवस पूर्ण करण्यास येत असतात. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शाकंभरी पोर्णिमा निमित्त तेथे देवीचा भंडारा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 



सकाळी ९ ते १०:३० वाजे दरम्यान पुरोहित निलेश कुळकर्णी यांचे पौरोहित्य खाली सावदा येथील चंद्रकात भास्कर चौधरी यांचे हस्ते देवी मातेचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर कळण्याची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, आमसुलची कढी आणि लिंबाचे लोणचे या पदार्थांचा भंडाऱ्याच्या प्रसादाचा आस्वाद भाविकांना वितरीत करण्यात आला. 





गेल्या ७ वर्षापासून शाकंभरी पौर्णिमा च्या दिवशी अविरत भंडारा सुरु आहे. यावर्षी भंडाऱ्याचे यजमान कुंभारखेडा येथील प्रदीप गंभीर पाटील, नकुल जगन्नाथ पाटील, सागर प्रमोद पाटील, सुरेशचंद्र रघुनाथ चौधरी हे भाविक होते. या भंडाऱ्यासाठी पाच पोते कळणा चां वापर केला गेला. 



साधारण ३००० भाविकांनी या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाकी कुशल जावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट असा स्वयंपाक बनविला. या निमजाय माता मंदिरात पुढील पाच वर्षासाठी भाविकांनी भंडारा देण्यासाठी आपले नाव नोंदविले आहे. या कार्यक्रमासाठी निमजाय माता मंदिर चे सर्व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी अमूल्य असे सहकार्य केले.


भंडाऱ्या वेळी आस्वाद घेतेलेला महाप्रसाद 


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा




या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post