खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. पती आणि राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ओढवलेल्या दु:खाच्या सावटाखाली असतानाच, त्यांनी "दादांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास पुढे नेणार," असा दृढ निश्चय व्यक्त केला आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांचे मन भरून आले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
नेमके काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
सुनेत्रा पवार म्हणाल्या, आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.
या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 'विकसित भारत 2047' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची जबाबदारी
अजित पवारांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीच्या काही वेळानंतरच सुनेत्रा पवारांना अजित पवारांकडील खात्यांपैकी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत.मात्र, अजित पवारांकडील सर्वात प्रभावी मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते सुनेत्रा पवारांकडे न देता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतःकडेच ठेवले आहे.
राज्य उत्पादन शुल्क हे राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल मिळवून देणारे खाते मानले जाते. तरुणांशी संबंधित असलेल्या 'क्रीडा आणि युवक कल्याण' खात्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार राज्यभरात आपले जाळे विस्तारू शकतात. याशिवाय अल्पसंख्यांक विकास खाते देखील सुनेत्रा यांच्याकडे देण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
शपथविधीनंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी केलेली पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











Post a Comment