स्वामिनारायण संप्रदायात होळी (फाल्गुन शुद्ध पौर्णिमा) आणि धुळवड पारंपरिक उत्साह, भक्ती आणि नैसर्गिक रंगांची उधळण करून साजरी केली जाते. होळी म्हणजे बाह्य रंगांपेक्षा अंतःकरणातील विकार जाळण्याचा दिवस.
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील वडताल धाम अंतर्गत असलेल्या श्री स्वामिनारायण मंदिर येथे २ मार्च रोजी पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन सोहळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी खग्रास चंद्र ग्रहण असल्यामुळे नियमित पौर्णिमा दर्शन सोहळा २ मार्च ला साजरा करण्यात येणार असल्याचे मंदिराचे विस्वस्थ कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी सांगितले.
मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम जसे भजन, कीर्तन, धून चे आयोजन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंदिरातील मूर्तींना विशेष सजावट तथा रंगीत वस्त्रे परिधान केली जातात आणि नैवेद्य अर्पण केला जातो.
स्वामिनारायण संप्रदायात होळी म्हणजे "फुलडोल". या दिवशी नरनारायणदेव जयंती निमित्त भगवानांना फुलांनी सजवलेल्या हिंडोळ्यावर (झुल्यावर) विराजमान केले जाते. नैसर्गिक रंग आणि फुलांची उधळण केली जाते. कीर्तन, भजन आणि सत्संग होतो. साधू-संत आणि हरीभक्त एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
हा उत्सव दि. ४ मार्च रोजी मोठ्या दिमाखात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट, विविध रंगांच्या फुलांची आरास करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सर्व स्वामिनारायण संप्रदायातील मंदिरामध्ये नैसर्गिक रंगांबरोबर सर्वाधिक विविध फुलांच्या पाकळ्याचा वापर करून होळी खेळली जाते. याला पुष्पडोलोत्सव म्हटले जाते.
या धार्मिक कार्यक्रमांचा आणि नरनारायण देव यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदास, पुजारी स्वामी सत्यप्रकाशदास तसेच व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व पुरुष व महिला हरिभक्तांना करण्यात आले आहे. सावदा शहर आणि परिसरासह रावेर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
रंगोत्सव सोहळ्यामध्ये मध्ये पुरुष व महिला हरिभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन भगवंताच्या या अद्भूत लिलेत रंगायच आहे.
स्थळ :- स्वामिनारायण मंदिर, सावदा
दि. ४ मार्च, २०२६ वेळ :- संध्याकाळी 5 वाजता
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |













Post a Comment