रंगोत्सवातून भक्ती, प्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश
सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात उत्साहात रंगोत्सव प्रवचनातून जीवनाला ‘भगवंताच्या रंगात रंगवण्याचा’ प्रेरणादायी संदेश
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
येथील श्री स्वामिनारायण मंदिर परिसरात रंगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
कार्यक्रमादरम्यान आयोजित निरुपणात वक्ते युवा संत स.गु. शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी यांनी रंगोत्सवाचा आध्यात्मिक आणि जीवन मूल्यांशी जोडलेला सुंदर संदेश मांडला. आपल्या प्रवचनात त्यांनी सांगितले, "रंगोत्सव हा केवळ रंग उधळण्याचा उत्सव नसून तो प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. प्रत्येक रंग आपल्या जीवनातील एका सकारात्मक भावनेचे प्रतीक आहे— लाल रंग प्रेम आणि त्याग दर्शवतो, पिवळा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे, हिरवा रंग आशा व प्रगतीचा संदेश देतो, तर निळा रंग शांतता आणि विश्वासाची जाणीव करून देतो." त्याच प्रमाणे, "खरा रंग तोच आहे जो भगवानाच्या भक्तीने आणि सत्संगाने आपल्या जीवनात भरतो. आजच्या काळात युवक अनेक आकर्षणांच्या रंगात रंगलेले दिसतात; मात्र सत्संग, सदाचार आणि भगवान भक्ती प्रेमाचा रंग जर जीवनात आला, तर जीवन अधिक सुंदर, अर्थपूर्ण आणि यशस्वी बनते."
प्रसंगी श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदाचे उपाध्यक्ष स.गु. शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी यांनी नरनारायण देव व सहस्रकुंची राक्षसाची कथा सांगून फुलदोलोत्सवाचा महिमा वर्णन केला. सदर कार्यक्रमास स. गु. शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, सावदा मंदिरचे कोठारी स. गु. शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, स.गु. शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, पुजारी स्वामी श्री सत्यप्रकाशदासजी, पार्षद श्री लक्ष्मण भगत, पार्षद श्री दिपक भगत, मानस भगत, वीरा भगत, शिवा भगत, आदी संतांची उपस्थिती होती.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व हरीभक्तांनी आनंदाने रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला. कीर्तन, भजन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सर्व हरीभक्तांनी नरनारायण देव हरिकृष्ण महाराज यांचे कडे प्रार्थना करत प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा रंग आपल्या जीवनात सदैव टिकून राहो अश्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे विस्वस्थ नंदू पाटील यांनी केले.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |




















Post a Comment