Khandesh Darpan 24x7

वाघोदा खुर्द येथे आदिवासी कोळी समाजाची विशेष बैठक संपन्न




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




वाघोदा खुर्द येथे आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या तर्फे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर तालुक्यातील विविध समस्या, संस्थेचा प्रसार व प्रचार कसा वाढवावा तसेच सदस्य संख्या वाढीसाठी पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच निवडणूक आयोगाशी संबंधित सुरू असलेल्या SRI याद्यांबाबत तसेच आगामी जनगणनेत आपल्या समाजाची नोंद “टोकरे कोळी” म्हणून व्हावी यासाठी संपूर्ण रावेर तालुक्यात जनजागृती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.



या बातमीचे प्रायोजक आहे. 





प्रसंगी संस्थेचे सल्लागार अशोक कोळी यांच्या चिरंजीवांची पुणे येथे आयटी क्षेत्रात उच्च पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.




या वेळी संस्थेचे संचालक मंडळ व जेष्ठ सभासद उपस्थित होते. संतोष सपकाळे (अप्पा सिंगत), हरिलाल भाऊ कोळी (कांडवेल), अध्यक्ष मनोहर कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद कोळी (शिवा भाईजी, पुनखेडा), सचिव योगेश्वर कोळी, सुभाष सपकाळे (सुनोदा), विनोद कोळी (नेहता), गोपाळ कोळी (खिरवड), विक्की कोळी (चोरवड), भुषण तायडे (रावेर), ईश्वर कोळी (चिनावल), अशोक कोळी (वाघोदा खुर्द), सुपडु कोळी (थोरगव्हाण), शरद कोळी (आंदलवाडी), विजय कोळी (अजनाड) आदी मान्यवर उपस्थित होते.



त्याचप्रमाणे वाघोदा खुर्द येथील चुडामण सपकाळे, चिराग कोळी, बाळु कोळी, दिपक कोळी, तुषार कोळी, दिपक तायडे, रवींद्र कोळी, राजेंद्र कोळी, शंकर कोळी, धोंडु कोळी, कैलास सपकाळे (सुनोदा), तुळशीराम सपकाळे (मस्कावद) यांच्यासह समस्त आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post