Khandesh Darpan 24x7

सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयात बिरसा मुंडा जयंती आणि शिक्षकेत्तर दिन साजरा...!



प्रतिनिधी :  प्रदीप कुळकर्णी राजेश चौधरी  


श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील पाटील विद्यामंदिर सावदा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच यंदा प्रथमच शाळेत शिक्षकेतर दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


या मध्ये मोतीराम भेरावा भाऊ साहेब, बाबुलाल भोई, मुरलीधर जंगले, शंकर कुरकुरे, उषा नेमाडे, अशोक वाणी, शेखर भेरवा, सुभेदार तडवी, सुलभा मेढे, विनोद महेश्री, कल्पना देवकर इत्यादी चा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, लिपिक सतीश पाटील, शाळेचे पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, जी.बी.तडवी, संजय भोई, निलेश चौधरी, स्वप्नील वंजारी, राधाराणी टोके, निर्मला बेंडाळे, चारुलता चौधरी, मोहिनी राणे, संजीव झांबरे, सचिन सकळकळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्र संचलन राजेश जावळे यांनी केले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم