प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री निष्कलंक धाम वढोदे येथे जागतिक योग दिनानिमित्त दि. २१ जून २०२४ रोजी सकाळी सहा ते आठ दरम्यान निसर्गरम्य वातावरणात भव्य अशा लॉनवर योग योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योग करण्यासाठी कोणकोणते आसन, प्राणायाम याचे मार्गदर्शन डॉ. आचार्य सचिनजी कृतीसह मार्गदर्शन करणार आहे. या शिबिराचा लाभ निशुल्क असून शिबिर संपल्यानंतर अल्पोपहार ठेवण्यात आला आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी सकाळी ६-०० वाजेच्या आत शिबीर स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री निष्कलंकधामचे प्रमुख महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी केले आहे. या शिबिरात श्री महाराज स्वतः उपस्थित राहणार आहे.
जनार्दन महाराजांचे वक्तव्य पाहण्यासाठी येथे क्लिक (tap) करा.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS

















إرسال تعليق