प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील श्री. आ. गं. हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक पी. जि. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पी. जि. भालेराव, तर महिला उपाध्यक्ष म्हणून सौ. शितल निलेश बेंडाळे, तर पुरुष उपाध्यक्ष म्हणून दुर्गादास बळीराम धांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी च्या प्रत्येक वर्गातील एक पालक प्रतिनिधीची निवड करण्यात आली. सभेला वाय. एन. पाटील, श्रीमती कल्पना शिरसाठ तसेच एस. एम. महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले. पालक शिक्षक संघाच्या आजच्या सभेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ तसेच इतर विषयावर चर्चा करण्यात येऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS












إرسال تعليق