प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
यावेळी कार्यक्रचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सौ. रेखाताई वानखेडे, सौ. नंदाबाई लोखंडे, सिमरन वानखेडे, मुख्याध्यापक पी. जी. भालेराव, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ठोंबरे, माजी मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्हि. तायडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ. शितल बेंडाळे, सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करुन शिक्षण घ्यावे आणि आपलं व शाळेचे तसेच गावाचे नांव मोठं करावं असं प्रतिपादन अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केलं.
तसेच यावेळी मुख्याध्यापक पी. जी. भालेराव, सिमरन वानखेडे, यांनी आपले विचार मांडले तर संजय महाजन यांनी नानासाहेब यांच्या जीवनाचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केलं.
श्री नानासाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आज वाढदिवस असलेल्या अनिल नेमाडे आणि इयत्ता 9 वी चा विद्यार्थी सुजय अतुल सपकाळे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS














إرسال تعليق