प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सातपुडा विकास मंडळ संचालित, कृषी विज्ञान केंद्र, पाल आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण युवकांसाठी कौशल्यावर आधारित ‘उच्चमूल्य भाजीपाला उत्पादन’ प्रशिक्षण कार्यक्रम दि. १५ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान कृषि विज्ञान केंद्र, पाल येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणात १८ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाला महेश महाजन, कृषी विज्ञान केंद्र, पाल उपस्थित होते. या प्रशिक्षणा दरम्यान उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेतीची ओळख, हरितगृह उभारणी, उच्च तंत्रज्ञान आधारित ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, ब्रोकोलीआणि विदेशी भाजीपाला लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी गांडूळ खात तयार करणे, भाजीपाला उत्पादन आवश्यक असणाऱ्या जिवाणूंचे संवर्धन करण्यासाठी मुरण तयार करणे, मातीविना शेती-हयाड्रोपोनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन जैविक कीडनाशक आणि बुरशीनाशक तयार करणे, फवारणीची साधने, फवारणीचे वर्गीकरण, नोझल्स एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण, लेबल क्लेम, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी इ., यांचे मार्गदर्शन व शैक्षणिक सहल चे आयोजन करण्यात आले होते.
दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी महेश महाजन, (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर व्हावे व उत्तम आणि जास्त आणि गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन करावे असे आवाहन केले आणि शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. धिरज नेहेते यांनी काम पाहिले तसेच महेश महाजन, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, पाल, अतुल पाटील, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. कुंदन चौधरी, मयूर नारखेडे, रहेमान तडवी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
![]() |
| जाहिरात |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















Post a Comment