Khandesh Darpan 24x7

खिर्डीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

 


प्रतिनिधी | निंभोरा



खिर्डी ते चीच फाटा  दरम्यानची घटना



रावेर तालुक्यातील खिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश देवगिरीकर यांच्यावर राजकीय वैमनस्यातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न अज्ञात गुंडांनी केला असल्याची तक्रार देवगिरीकर यांनी केली आहे.



देवगिरीकर हे खिर्डी येथून धामोडी येथे जात असताना शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या मोटरसायकलमागे अनोळखी दोन ते तीन अज्ञातांनी शिवीगाळ करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला व धारदार वस्तू बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला असता गणेश देवगिरीकर हे चिंच फाटा येथून वेगाने धामोडी गावाकडे निघाल्याने बचावले. या घटनेबाबत निंभोरा पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों रिजवान पिंजारी करत आहेत.



प्रतिक्रिया:-

मला राजकीय वैमनस्यातून जिवे ठार करण्याचा प्रयत्न झाला, याआधीदेखील माझ्या शेतापर्यंत कारमधून चार गुंड मला शोधत आले होते. माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या गावातूनच त्या गुंडांना माझी माहिती पुरवली जात आहे, असे मला कळाले. त्या माहिती देणाऱ्याला आणि त्या गुंडांना लवकरात लवकर पोलिस प्रशासनाने पकडावे, अशी विनंती आहे.


-गणेश देवगिरकर,

ग्रा. पं. सदस्य, खिर्डी बुदुक



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

Previous Post Next Post