एकाच रात्री दहाच्यावर शेतकऱ्यांच्या केबल चोरी.
प्रतिनिधी | निंभोरा
येथील महावितरण उपकेंद्र (सबस्टेशन) मागील निंभोरा-विवरा रस्त्यावरील सबस्टेशन ते नागदेव मंदिरा दरम्यान असलेल्या टुबवेल व विहिरीच्या केबल चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि.०७ डिसेंबर ते रविवार ०८ डिसेंबर च्या रात्री दरम्यान काही भुरट्या चोरांनी निंभोरा-विवरा रस्त्या वरील निंभोरा सबस्टेशन ते नागदेव मंदिर दरम्यान रस्त्यालगत असलेल्या विहीर व टुबवेलच्या केबल व स्टाटर चोरीला गेल्याची धक्कादायक बाब रविवारी पहाटे शेतकऱ्यांच्या लक्षात आली. तेंव्हा एकच गोंधळ उडाला.
भुरट्या चोरांनी केबल काटून नेल्याचे दिसताच सर्वांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. ऐन हंगामाच्या काळात पिकाला पाण्याची आवश्यकता असतांना हा प्रकार घडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कपाशीला भाव नसतांना हे संकट शेतकऱ्यांवर ओढवल्याने खुप मोठे संकट समोर आले आहे.
यात ईश्वर कडू नेमाडे, अनिल रघुनाथ कोंडे, कैलास वामन भंगाळे, डॉ.स्वप्नील भंगाळे, प्रभाकर महारू भोगे, अशोक अर्जुन नेमाडे, श्रीकांत महाजन, रवींद्र काशीराम भंगाळे अशा एकूण जवळ जवळ दहाच्यावर शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत सर्वांना सोबत घेऊन निंभोरा पोलिसात खबर देणार असल्याचे शेतकरी ईश्वर नेमाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق