Khandesh Darpan 24x7

यश मिळविण्याचा हमखास मार्ग म्हणजे परिश्रम - सचिन सकळकळे




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्ती ओळखा, आपले गुण अवगुण माहिती करून घ्या, परिश्रम घ्या म्हणजे यश हमखास मिळेल. असे प्रतिपादन सावदा येथे अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी सावदा येथे पारितोषिक वितरण समारंभात केले.



ब्राह्मण हितवर्धिनी समिती सावदा तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक सोहळा श्री अभिजित ओवे यांच्या प. पू. रामचंद्र पारनेरकर महाराज मंदिरात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुरामच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाली. यावेळी स्वरूप सकळकळे, समर्थ सकळकळे सोहम मटकरी, गौरी जोशी, केतकी मटकरी, राधिका कुळकर्णी, या सह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 



यावेळी प्रमुख पाहुणे भुसावळ ब्राह्मण संघांचे सदस्य अतुल जोशी होते. त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये समाजाने एकजूट होणे गरजेचे असून नव्या पिढीने यासाठी पुढे व्हावे. अशी भावना व्यक्त केली. तर खिरोद्याचे माजी सरपंच दिनकर कुळकर्णी यांनी समाजाने मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 



कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रदीप कुळकर्णी, सानिका मटकरी, श्रीकांत मटकरी, रवींद्र कुळकर्णी, कविता सकळकळे, रितेश सकळकळे, केतन कुळकर्णी, अपूर्वा कुळकर्णी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अभिजित ओवे यांनी केले.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

Previous Post Next Post