Khandesh Darpan 24x7

यावल चे माजी नगराध्यक्ष कालवश




प्रतिनिधी | थोरगव्हाण 





यावल येथील देशमुख वाड्यातील मूळ रहिवासी, आदर्श नामवंत शेतकरी तसेच दि. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) ता. रावेर चे  पितामह ज्येष्ठ शालेय समिती संचालक व मार्गदर्शक, त्याचप्रमाणे तारकेश्वर विद्या प्रसारक मंडळ यावल चे सेक्रेटरी, तथा यावल शहर माजी नगराध्यक्ष लेवापाटील थोरगव्हाणकर समाज प्रवाहाचे दिग्गज व्यक्तीमत्व माधवराव त्र्यंबकराव देशमुख यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ०१ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ०६:४५ वा. प्राणज्योत मालवली.



ते यावल येथील प्रगतीशील शेतकरी व दि. एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे सहसचिव रामराव देशमुख यांचे वडील होते.



त्यांचे पश्चात रामराव देशमुख, शिरीष देशमुख, दोन सूना, पाच मुली, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.



दि. एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सर्व संचालक, बंधू-भगिनी, मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील व सर्व स्टाफ यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



अंत्ययात्रा आज दि. १ जानेवारी, २०२५ सायंकाळी ०७ वाजता त्यांचे राहते घर देशमुख वाडा येथून निघेल.



पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



पुण्यस्मरण  जाहिरात 




ओम शांती

 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 



Post a Comment

Previous Post Next Post