Khandesh Darpan 24x7

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, अशोक सराफ यांना पद्मश्री: मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मविभूष पुरस्कार

कु डिंपल हिची वाढदिवस   जाहिरात खाली पहा 


देश-विदेशातील 139 जणांचा सन्मान





खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा 





दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कार जाहीर केला जातो. यंदाच्या पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेकांची घोषणा करण्यात आली. डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार आणि अशोक सराफ यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील इतरही राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांची नावे पद्म पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. विलास डांगरे यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी, मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.


गोव्याच्या १०० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालचे धक वादक गोकुल चंद्र दास, मध्य प्रदेशातील सामाजिक उद्योजिका सायली होळकर, नागालँडचे फळ शेतकरी एल हँगथिंग, पुद्दुचेरीचे संगीतकार पी दत्चनामूर्ती यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी लेखक जगदीश जोशीला, लोकगायक नरेन सुरंग, पैरो सिंह चौहान यांसह कर्नाटकचे लोकगायक वेंकप्पा अंबाजी यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सम्नान केला जाणार आहे.














३ श्रेणींमध्ये दिला जातो पद्म पुरस्कार

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये समाविष्ट असलेला पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा ३ श्रेणींमध्ये दिला जातो कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात.


गेल्या वर्षी चिरंजीवी, वैजंतीमाला मिळाला होता सन्मान गेल्या वर्षी माजी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू, दक्षिण चित्रपट अभिनेता चिरंजीवी, अभिनेत्री वैजयंतीमाला, भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम हे पद्मविभूषण मिळालेल्या काही प्रमुख व्यक्ती होत्या. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम फातिमा बीबी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


देशातील नागरी पुरस्कारांविषयी थोडक्यात माहिती

देशात नागरी पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले. या ४ प्रकारच्या पुरस्कारांमध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. आम्ही देशातील चार नागरी सन्मानांबद्दल सांगत आहोत. या पुरस्कारांची घोषणा २६  जानेवारी रोजी केली जाते. पुरस्कार प्रदान समारंभ मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात होतो. या पुरस्कारांमध्ये पदक आणि सन्मान प्रमाणपत्र असते.


भारतरत्न पुरस्कार : हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा पुरस्कार राष्ट्रीय सेवा, क्रीडा, विज्ञान, साहित्य, कला यासारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जातो. भहा पुरस्कार एका वर्षात फक्त ३ लोकांना देता येतो. आत्तापर्यंत एकूण ४८ जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. १९५४ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणार सर्वात तरुण व्यक्ती आहे.


पद्मविभूषण पुरस्कार : हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवांचाही समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार हा भारताकडून दिला जाणारा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो देशासाठी बहुमुल्य योगदानासाठी दिला जातो.


पद्मश्री पुरस्कार : कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यकिय, समाजसेवा इत्यादींमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल दिला जातो. एका वर्षात १२० पेक्षा जास्त पुरस्कार दिले जाऊ शकत नाहीत.
सौजन्य : दै.दिव्य मराठी  
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/central-government-announces-padma-awards-maroti-chitampalli-vilas-dongre-chaitram-pawar-134357094.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=134357094&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXz8nMy9ZLySyrTMxNLEosycjUS87P1a9ytQgqd630KwpMsq8rSk1LLSrKzEuPTyrKLy9OLbJ1zijKz00FAEeYVcJDAAAA

--------------------------------------------------------------------------------


सावदा ता. रावेर शहरातील रहिवाशी श्री हेमा ज्ञानदेव पाटील व सौ. माधुरी हेमा पाटील यांची परी कु. डिंपल हिस वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.



शुभेच्छुक : 


आजोबा- श्री ज्ञानदेव सुदाम पाटील

आजी- सौ. शैलजा ज्ञानदेव पाटील

वडील- श्री हेमा ज्ञानदेव पाटील

आई- सौ. माधुरी हेमा पाटील

--------------------------------------------------------------------------------


या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 






Post a Comment

أحدث أقدم