Khandesh Darpan 24x7

ग्रामपंचायत कर थकबाकी ५५ कोटीवर : जिल्ह्यातील वसुली फक्त ४६ टक्केच

पुण्यस्मरण जाहीरात खाली पहा 



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा 


डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हयातील १९५९ ग्रामपंचायतींच्या सन २०२४-२५ साठी घरपट्टी, पाणीपट्टीची करवसुली अवधी ४५-४६ टक्के झाली आहे.मार्च अखेरीस अवघा दिड महिना असताना थकबाकीचा फुगा ५५ कोटींवर गेला आहे. एकूण कर थकबाकीसह मागणी १०१ कोटी असून आतापर्यंत ४ कोटींची वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत ७० टक्के वसुली न झाल्यास ग्रामसेवकांकर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.



यंदा घरपट्टी आणि पाणीपट्टी तब्बल ८० कोटींपेक्षा जास्त 

यंदा घरपट्टी व पाणीपट्टी ८० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यात घरपट्टी ४२ कोटी ७० लाख २० हजार तर पाणीपट्टी ३७ कोटी २२ लाखांची थकबाकी आहे. डिसेंबर अखेर घरपट्टी वसुली ४५.८२ टक्के तर पाणीपट्टी वसुली ४६.७७ टक्के झाली आहे.



ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टीची करवसुली मार्चअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र डिसेंबरपर्यंत करवसुली संथगतीने झाली आहे. ग्रामीण भागातील कर वसुलीकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून आढावा घेतला जात नसल्याने किवा प्रयत्न होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यातील १९५९ ग्रामपंचायतींची कर वसुली पाहता १ एप्रिल २४ ची थकबाकी अर्थात गेल्या वर्षाची थकबाकी २१ कोटीपेक्षा अधिक आहे.


यात घरपट्टी १० कोटी ९५ लाख तर पाणीपट्टीची मागील थकबाकी १० कोटी ३९ लाख आहे. करवसुलीत सध्या भडगाव, एरंडोल उत्तम ठरले आहे. तर बोदवड, जळगाव, रावेर तालुके पिछाडीवर आहे. बोदवड तालुक्यात पाणीपट्टीची सर्वाधिक ९१ टक्के वसुली झाली आहे. तर भुसावळ तालुक्यांची सर्वात कमी पाणीपट्टी वसुली (३८ टक्के) आहे. मार्च अखेर ७० टक्के कर वसुली बंधनकारक आहे.

सौजन्य : दै.दिव्य मराठी 








या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 






Post a Comment

أحدث أقدم