Khandesh Darpan 24x7

ऐनपुर येथे पत्रकार भवन भुमीपुजन व पत्रकार मेळावा उत्साहात साजरा



प्रतिनिधी | एनपुर, निंभोरा 




ऐनपुर येथे पत्रकार भवन भुमीपुजन व पत्रकार मेळावा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे पत्रकार भवन साठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या जागेवर भव्यदिव्य पत्रकार भवन बांधकाम करायचे असून त्या जागेवर भुमीपुजन सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई जी) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 



नंतर सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील सांस्कृतिक सभागृहात पत्रकार मेळावा घेण्यात आला या पत्रकार मेळाव्यात महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी सुनिल भोळे यांना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी लक्ष्मण ठाकूर यांची नियुक्ती केली तसेच रावेर तालुका अध्यक्ष पदी विजय शामराव अवसरमल यांची नियुक्ती करण्यात आली. 


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई जी), जिल्हा अध्यक्ष सुनिल भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर, ऐनपुर ग्रामपंचायत चे सरपंच अमोल महाजन, अतुल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, मंडळ अधिकारी गजेश्वर शेलकर, श्रीराम पाटील, पांडुरंग पाटील, प्रा. व्हि. एच. पाटील, पत्रकार राजीव बोरसे, नगिनदास इंगळे, प्रकाश पाटील, प्रविण धुंदले, बाळू शिरतुरे, राहुल गाढे, विनायक जहुरे, संजय पाटील, राजेश चौधरी, प्रदिप कुलकर्णी, ईश्वर महाजन, राहुल जैन, संकेत पाटील, विनोद कोळी, चंद्रकांत कोळी, कांतीलाल गाढे, परमानंद शेलोडे, सादिक पिंजारी, जितू इंगळे, जितू कोळी, सलमान खान, विजय काशिनाथ अवसरमल, रमेश शामराव अवसरमल, श्रीराम पाटील (एस कुमार) व परीसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय अवसरमल व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल विनायक आसेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर विश्वनाथ महाजन यांनी मानले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم