Khandesh Darpan 24x7

टाटा, अंबानी यांना टक्कर देणारी भारतातील एकमेव महिला; 20,700 कोटींची कमाई, वयाच्या 50 व्या वर्षी सुरु केला स्टार्टअप

या भारतीय महिलेने वयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. ही महिला टाटा, अंबानी यांना टक्कर देणारी भारतातील एकमेव महिला आहे.



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा 






रतन टाटा, मुकेश अंबानी हे भारतातील नव्हे तर जगातील यशस्वी उद्योजक आहेत. या दिगग्ज उद्योगपतींना भारतातील एक महिला उद्योजक टक्कर देते. वयाच्या 50 व्या वर्षी स्टार्टअप सुरु करणारी ही महिला 20,700 कोटींची कमाई करते. फाल्गुनी नायर (Falguni Nayar) असे महिलेचे नाव आहे.



फाल्गुनी नायर या ‘Nykaa’ ब्रँडच्या फाऊंडर आहेत. सध्या 'Nykaa' हा ब्रँड देशातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक ब्रँड बनला आहे. फाल्गुनी नायर या Nykaa कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष, एमडी आणि सीईओ आहेत. टाटा, अंबानी यांच्या ब्रँडला टक्कर फाल्गुनी नायर यांचा Nykaa ब्रँड टाटा ग्रुपच्या कॉस्मेटिक ई-रिटेलिंग साइट 'टाटा क्लिक' आणि मुकेश अंबानींच्या ब्युटी ब्रँड 'टिरा'ला या ब्रँड्सना टक्कर देत आहे. दिवसेंदिवस Nykaa ब्रँड अधित प्रसिद्ध होत आहे. Nykaa खूपच लोकप्रिय होत आहेत.



फोर्ब्सच्या रिअल टाईम रिच लिस्टनुसार, भारतातील 13 अब्जाधीश महिला उद्योजकांमध्ये फाल्गुनी नायर यांचे नाव देखील सामील झाले आहे. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत फाल्गुनी नायर यांचा थेट सहभाग असतो. अशा प्रकारे कंपनीचे सर्व निर्णय घेणाऱ्या त्या एकमेव सीईओ व्यावसायिक महिला आहेत. फाल्गुनी नायर या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 20,700 कोटी रुपये इतकी आहे.



ठरवले तर काहीही अशक्य नाही आणि वय हा फक्त आकडा असतो हे फाल्गुनी नायर यांनी त्यांच्या यशातून सिद्ध करुन दाखवले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी स्टार्टअप सुरु केला आणि तो यशस्वी देखील करुन दाखवला आहे. फाल्गुनी नायर यांनी आयआयएम-अहमदाबाद येथून शिक्षण घेतले आहे. जवळपास 20 वर्षे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ब्रोकिंग क्षेत्रात काम केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये त्यांनी Nykaa ब्रँड लाँच केला. अल्प कालावधीत या ब्रँडने मोठे यश मिळवले असून त्या सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक ठरल्या आहेत. Nykaa ब्रँड फक्त ई-रिटेलिंगच करत नाही तर या ब्रँडने स्वत:चे 35,000 प्रोडक्ट देखील लाँच केले आहेत. Nykaa चे देशभरात 17 स्टोअर देखील आहेत. Nykaa ब्रँडने अनेक सेलिब्रिटींसोंबत पार्टनरशिप केली आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 






Post a Comment

أحدث أقدم