प्रतिनिधी | निंभोरा
जळगाव येथे सरदार वल्लभभाई सभागृहात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 25 मार्च रोजी आगामी सण उत्सव यांच्या निमित्ताने शांतता समितीची सभा घेण्यात आली यावेळी आगामी येणारे सण उत्सव रमजान ईद हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब जयंती रामनवमी हे सण उत्सव शांततेत कसे साजरे करावे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांनी ही बैठक आयोजित केली होती यावेळी तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सदरचे सण उत्सव शांततेत कसे साजरे करावे याविषयी आपले मार्गदर्शनपर भाषणातून विचार सांगितले प्रामुख्याने या बैठकीला जिल्ह्यातून तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत यामध्ये चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, धरणगाव या तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातून आलेल्या शांतता समितीच्या काही सदस्यांनी आपले मनोगतातून विचार व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق