Khandesh Darpan 24x7

श्री स्वामीनारायण मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त घागर भरणी कार्यक्रम




प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे अक्षय तृतीयेनिमित्त परंपरागत पद्धतीने आपल्या परिवारातील निवर्तलेले आपले त्यांच्या घागरी भरण्याचा कार्यक्रम आपण नेहमी करत असतो परंतु सांसारिक माणसाला विविध प्रकारच्या अडचणी असतात. जनन सुतक, मरण सुतक किंवा वेगवेगळ्या अडचणी त्यामुळे घागर भरली जात नाही. वर्षातून एकचदा येणाऱ्या या पर्वाला घागर भरली गेली नाही म्हणजे माणूस मानसिकरित्या त्याचं मन खट्टू होतं. त्यामुळे श्री स्वामिनारायण  संप्रदायांमध्ये ही एक प्रणाली आहे. 





अक्षय तृतीयेच्या दिवशी मंदिरामध्ये घागरी भरल्या जातात घरी अडथळा जरी असला तरी मंदिरामध्ये ही घागर भरल्यामुळे माणसाला समाधान प्राप्त होते व पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण काहीतरी केल्याचा एक वेगळाच आनंद हरिभक्तांना प्राप्त होत असतो. अशा प्रकारचे हे आयोजन श्री स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास त्याचप्रमाणे स्वामीनारायण मंदिरातील जेष्ठ संत शास्त्री स्वामी धर्मकिशोरदास,  पुजारी शास्त्री स्वामी सत्यप्रकाशदास, स्वामी माधवप्रियदास, पार्शद मानस भगत, पार्षद वीर भगत, पार्षद शिवा भगत त्याचप्रमाणे शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदास हे सुद्धा त्यांना खांद्याला खांदा लावून सहकार्य करत असतात. 



या घागरी भरण्या कामी घागरी आणून त्यावरती जो व्यक्ती मृत झालेला आहे किंवा ज्याच्या नावानं घागर भरायची आहे त्याचं नाव त्यावरती टाकलं जातं व ती घागर अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने गहूच्या राशीवर ठेवून त्याची यथासांग पूजन केलं जातं व त्याचप्रमाणे होमात्मक पद्धतीने होम हवन करून आपल्या पितृंना तर्पणविधी होऊन नंतर होमात्मक आवाहन व आहुती दिल्या जातात. अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट असा हा सोहळा परंपरेनुसार यावर्षी सुद्धा श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा होत आहे. 





भव्य दिव्य म्हणजे यावर्षी एक हजार तीन घागरी मंदिरामध्ये भरल्या जात आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नुसताच अध्यात्मिक भूमिका न ठेवता सामाजिक भूमिका सुद्धा या संतांनी व मंदिराचे सर्व विश्वस्त यांनी बाळगलेली आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये जे भारतीय हिंदू नागरिक अतिरेक्यांच्या गोळीबारामध्ये नाहक मारले गेले त्यांना सुद्धा शांती प्राप्त व्हावी यासाठी त्यांच्या नावाने मंदिरामध्ये घागर भरली जाणार. त्याचप्रमाणे सीमेवरती आपल्या देशाचे संरक्षण करणारे जे सैनिक बंधू आहे. आपल्या देशाचं संरक्षण करताना जे शहीद झालेत त्यांच्या नावाने सुद्धा घागर भरली जात आहे



त्याचप्रमाणे संपूर्ण भारत वर्षामध्ये भारताच्या समृद्धीसाठी भारताच्या प्रगतीसाठी भारताच्या यशासाठी ज्या ज्या साहित्यिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि जे जे प्रतीचे शास्त्रज्ञ या सर्वांच्या नावाने तिसरी घागर भरली जाते अशा पद्धतीने अतिशय सामाजिक आणि अध्यात्मिक वातावरणामध्ये हा सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी दिनांक ३० मार्च रोजी भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा होणार होत आहे. 



प्रसंगी मंदिराच्या कोठारी शास्त्री स्वामीस्वयंप्रकाशदास यांनी सर्व परिसरातील हरिभक्तांना आवाहन केलेले आहे की हा भव्य दिव्य सोहळा याच दर्शन करण्यासाठी सर्वांनी मंदिरामध्ये आवर्जून भेट द्यावी व या सोहळ्याचा आनंद घ्यावा या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वामीनारायण मंदिराचे विश्वस्त व तरुण हरिभक्त यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. यामध्ये नंदू पाटील सर, गणेश सापकर सर, त्याचप्रमाणे तरुण कार्यकर्त्यांमध्ये जयेश पाटील, खुशाल भंगाळे, ईशान पाटील, वरद पाटील, गितेश नेहते, गणेश पाटील या मंदिरामध्ये जेवढे लहान लहान बालक उपस्थित असतात या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे व या उत्सवाच्या यशस्वी साठी सर्वजण कंबर कसून प्रयत्न करीत आहे.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم