खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
'भारताला सध्या तरी नव्या मोठ्या कोरोना लाटेचा धोका दिसत नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‘'जेएन-१’ या ओमायक्राॅनचाच नातू म्हणावा अशा व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत, परंतु यामुळे अजिबात घाबरण्याचे कारण नाही,' असे गंगाखेडकर यांनी सांगितले. 'या नवीन विषाणूमुळे संसर्ग होण्याचा वेग वाढतो, मात्र तो धोकादायक नाही असे ते म्हणाले. नव्या व्हेरियंटमुळे लागण किती होते आहे हे महत्त्वाचे नाही, तर रुग्णालयात भरती किती होतात, मृत्यू दर किती आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता उगाच घाबरून जाऊ नका' असे आवाहन गंगाखेडकर यांनी केले.
हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसारख्या अनेक आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दरम्यान, आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. १ मे ते १९ मेदरम्यान सिंगापूरमध्ये ३ हजार रुग्ण आढळले. त्यानंतर राज्यात मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र हा अजिबात धोकादायक नाही. राज्याचे आरोग्य खाते सावधगिरीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देत असते. पण त्याने पॅनिक होण्याची गरज नाही. कारण यामुळे इस्पितळात दाखल होण्याचे आणि मृत्यू होण्याची शक्यता नाही. हा विषाणू व्हेरियंट आॅफ कन्सर्न म्हणजे धोकादायक नसून व्हेरियंट अंडर माॅनिटरिंग म्हणजे धोकादायक आहे का हे पाहण्यासाठी निरीक्षणाखाली असलेल्या गटामध्ये मोडतो, असे गंगाखेडकर यांनी सांगितले.
भारतीयांना त्याचे संरक्षण आहे
हायब्रीड इम्युनिटी रुग्णालयात भरती होणे कमी करते. तीव्र काेरोना व मृत्यूची शक्यता कमी करते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. बूस्टर डोस घेतल्यामुळे संसर्ग हाेण्याची शक्यता कमी होत नाही, असे कोणीही म्हटलेले नाही. अतिजोखमीच्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी बंद खोली वा वातानुकूलित खोलीत न चुकता मास्क घालावा. मुलांना सर्दी वा खोकला झाल्यास शाळेत पाठवू नका.
हायब्रीड इम्युनिटीचे संरक्षण
नोव्हेंबर २०२१ मध्ये द. आफ्रिकेत ओमायक्राॅन दिसला. त्यानंतर व्हेरियंट आॅफ कन्सर्न धोकादायक विषाणू दिसलेला नाही. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची नावे ठरलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन येणाऱ्या विषाणूंचीही नावे ठरलेली आहेत. नवीन विषाणू आल्यास पाय येईल. आपल्याकडे व्हॅक्सिन व संसर्गाची हायब्रीड इम्युनिटी विकसित झालेली आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
सौजन्य : दै.दिव्य मराठी
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق