
प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर येथील रहिवासी राजु अन्वर तडवी यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई असा परिवार आहे. ते मालोद ता. यावल येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते.
राजु तडवी मनमिळाऊ स्वभावाचे, सामाजिक कार्यक्रमांत हिरारीने सहभागी होणारे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक होते. त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या उत्कृष्ट कार्य कर्तृत्वाने सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने समाजात पोकळी निर्माण झाली आहे.
ते यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी एच.एन.तडवी यांचे भाचे होते.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा








إرسال تعليق