Khandesh Darpan 24x7

देशमुख विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची पोलिस दलात निवड



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


गाते (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी आणि डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथील माजी विद्यार्थी तुषार मंगला किशोर मोरे यांची नुकतीच मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. तुषार गाते स्टेशन येथून दि . 25 में रोजी मुंबई येथे ट्रेनिंगसाठी रवाना झाला आहे . त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आणि विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



गावच्या लोकनियुक्त प्रथम आदिवासी महिला सरपंच सौ. सारिका गणेश पाटील यांनी तुषार मोरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तुषारने सर्व जेष्ठ नागरिक, माता-भगिनी, मित्रमंडळी यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.



तुषार मोरे यांनी थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख विद्यालयात 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती, सर्वधर्म समभाव ही मूल्य इतर विषयासह स्काऊट उपक्रमांमधून आत्मसात केली. बालपणीच पितृछत्र हरवले, तरीही धैर्याने आणि मेहनतीने परिस्थितीवर मात करत, शिक्षणासोबत मोलमजुरी करून स्वकर्तृत्वाने यश प्राप्त केले. आज त्यांनी मुंबई पोलिस दलात निवड होऊन आपल्या कुटुंबाचे, शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल केले आहे.



दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व .संचालक मंडळ व डी. एस. देशमुख विद्यालयाचे मुखाधापक सत्यनारायण वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग तुषार मोरे यांचे अभिनंदन करतात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत .




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  

 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post