Khandesh Darpan 24x7

मतीन खान यांना बी.यू.एम.एस. परीक्षेत प्रथम श्रेणी



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा येथील मतीन अहमद खान यांनी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या चतुर्थ व्यावसायिक बी.यू.एम.एस. (आर एस ५) परीक्षेत १७४० पैकी ११०६ गुण मिळवत प्रथम श्रेणी मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्यांनी गुलबर्गा येथील इनामदार युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे शिक्षण घेतले.


मतीन खान  हे सावदा येथील संजरी डिजिटल स्टुडिओचे संचालक व बातमीदार अजहर खान यांचे भाचे असून त्यांच्या यशाबद्दल आई श्रीमती राबिया बी यांनी अभिमान व्यक्त केला. मतीन यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेल्यानंतरही त्यांनी स्वतःच्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने मिळवलेले हे अभूतपूर्व यश खरोखरच प्रेरणादायी आहे.


मतीन हे खान कुटुंबातील पहिले डॉक्टर ठरले असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण खानदानाचा गौरव वाढला आहे. कुटुंबीयांनी आणि सावदा गावातील नागरिकांनी मतीन यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  

 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post